Tuesday, 4 May 2010

पाटी आणि ५ पैसे...


पाटी म्हटलं कि आपोआपच लहानपण डोळ्यासमोर येत.पाटी,पेन्सील,दप्तर,खाऊ या सगळ्या एकमेकांशी निगडीत गोष्टी.एकदा असच लहानपणी मला खाऊला ५ पैसे भेटले.त्यावेळी खाऊसाठी ५ पैसे खूप होते.ते  मला भेटले ते या अटीवर कि माझा घरचा अभ्यास पूर्ण केल्यावरच मी खाऊ  आणावा.मीही आज्ञाधारक होतेच.होकार देऊन मी माझा अभ्यास पूर्ण करायला घेतला.पण तो करताना पैसे हरवू नये म्हणून मी ते पाटीच्या वरच्या कडेत ढकलले होते.अभ्यास पूर्ण झाल्यावर मला ते सापडलेच नाही.खूप शोधले तरीही.पाटी हलवल्यावर  ते कुठे तरी पडले असावे.मी वरच्या कडेत ढकलले पैसे सगळ्या कडांत शोधले.अगदी मागून-पुढून.पण काही सापडेना.शेवटी हैराण होऊन खेळायलाहि  न जाता मी पुन्हा अभ्यास करायला बसले.ते या आशेवर कि कदाचित ते पैसे कुठल्यातरी कडेने बाहेर येतील.बरेच दिवस उलटले, कित्येक महिने,वर्ष्य गेलीत.ते सापडले नाहीत .त्या नंतर कित्येकदा मला खाऊला पैसे भेटले कितीतरी पटीने जास्त.मी नवीन पाटीही घेतली होती...त्यातही शोधले...हे जाणून  होते कि त्यात सापडणार नाही.आजही पाटी दिसली कि मी त्या पाटीत  माझे ५ पैसे शोधते.अगदी कडा चाचपडून.हे माहित असूनही कि हि पाटी माझी नाही...आणि आता ते सापडणार नाहीत.

7 comments:

 1. मस्त लिहिले आहेस एकदम !

  ReplyDelete
 2. chhan vatale vachun.. shalechya divasanchi athwan zali.. Ramya te balpan!!!

  ReplyDelete
 3. marathit (type) karta nahi yeta pan (may be) yenarya (posts) madhe marathitch karen.(Waiting to read next interesting fullfledge well plotted story).

  ReplyDelete
 4. Khoop khoop sunder....!!! :)

  ReplyDelete
 5. मस्त आठवण ! बालपणीच्या आठवणींनी हळवा झालो. पहाटे पहाटे अंगणात बसून पाटीवर अभ्यास करणे !! सुख !! अशावेळी गालिब आठवतो, "जी ढूँढता हैं फिर वोही फुरसत के रात दिन". बालपणीचे दिवस आठवून कविताही लिहीली होती याच शीर्षकाची. :)(http://manmanjusha.blogspot.com.au/2012/04/blog-post_20.html)

  एक सांगू का ? तुमची पाटी दुहेरी प्रकारातली असावी. त्यामुळे फटीत टाकलेला पैसा(हा तोच ना चौकोनी अर्धवर्तुळाकार कडा असलेला ? ) पाटीच्या आत गेलेला असावा, आणि फसला की आवाज येत नाही, त्यामुळे कळत नाही. पाटीच्या कडा उकलून शोधायचा ! :)

  -(स्वानुभवावरुन)


  अवांतर : तेव्हा ५ पैशाची बक्षिसीही खूप मोठी वाटायची ! पाच,१०,२० पैसे बंद झाल्यावरदेखील मी काही नाणी जपून ठेवली होती. शोधावी लागतील आता. बालपणीच्या सामानात कुठेतरी असतीलच.

  ReplyDelete

Pages