Sunday, 27 February 2011


काळ सुद्धा तुझंच चुकलं,
पण तू ते स्वीकारलं नाहीस.
माझ सगळं खरं असूनही,
मलाच तू फेटाळलसं.


वाहत्या पाण्याला म्हणे..
वाहण्यासाठी..फक्त दिशा लागते.
आणि थकलेल्या मनाला...
सांभाळून घ्यायला एक नाजूक वाट लागते.


"काल" सुद्धा आजही डोळ्यात
अगदी स्पष्ट तसाच आहे.
त्याचचं नशीब वाईट..
त्याचा काळच तसा आहे.माझ्या डोळ्यात अश्रूचा
एक थेंबही त्यांना नको होता.
असे त्यांचे अति लाड नाही,
प्रेमाचाच तो एक प्रकार होता.

लिहायचं म्हटलं
कि खूप सारा गोंधळ होतो.
लिहायला खूप सुचतं
फक्त हात जरा कमी पडतो.


काल बाबांनी चुकलं म्हणून,
पाठीत धपाटा घातलेला.
आणि काही क्षणात,
चेहरा त्यांचा काळजीने दाटलेला.


बाहेर मनाला शीतलता देणारी..
स्वच्छ,सुंदर पहाट.
मागचं काहीच आठवत नाही,
आठवतो तो फक्त "आज".

सांडलेलं चांदणं,
झेलायचच राहून गेलं.
आज कळतये,
किती जगायचं राहून गेलं.

Pages