Tuesday 1 February 2011


मी घाबरत नाही खंर तरं..
माझ्यातही लखः प्रकाश आहे "वेगळं करण्याचा".
फक्त थोडा विश्वास डगमगला होता..
तो जगापुढे मांडण्याचा.
हात कापला काय..आणि काळीज कापून दिलं काय..
लोकांना त्याची कदर नसते.
आपल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीवर.. 
त्यांची वटवाघुळाची नजर असते.

गुलमोहोर बघण्याची सवय
नंतर इतकी सुटली होती...
कि जेव्हा मला स्मरण झाले..
त्या जागेवर फक्त त्याची एक काठी होती.

चांगलं वेगळं केलं कि..
लोकं पाय खेचत राहतात..
म्हणूनच अशी स्वप्न फक्त..
कवितेतच सुरक्षित राहतात.

बोलायला खूप सोपं असतं,
असं आयुष्याचं तत्वज्ञान.
प्रत्यक्षात आयुष्यात बघावा लागतो..
कित्येकदा आपला मान-अपमान.


कविता म्हणजे काय ...
गंमत नसते जोडशब्दांची.
शब्द शब्दात झळकणारी,
प्रतिमा असते मनाची.

फुलपाखरासारखं आयुष्यही,
भरभर बदलत जातं.
कालचा दुःख सुद्धा मग,
आजच्या प्रश्नांनी विरुण जातं.

नाईलाजात म्हणे कुठेतरी..
इलाज असतो दडलेला.
तोच आपल्याला दिसत नाही..
म्हणून नाईलाज असतो पडलेला.

Pages