Wednesday, 3 August 2011

चौकट!

चौकटीत राहू जगणं म्हणजे..
अर्थहीन जीवन,अस्तित्वाचा खेळ.
चौकट तोडून जगणं..म्हणजे..
नियम तोडल्याची भीती,लढाई...
चौकटच ठरवते माणसाचं आयुष्य,
आणि बिघडवतेही  तीच.
चौकट बनते कधी स्वार्थी वृत्ती 
तर कधी नियम ..
माणूस मात्र गोंधळळेला ..
चौकटीतही..आणि चौकटी बाहेरही.

11 comments:

 1. Vaah Asmita ! Sundar Kavta ! Asech manatil vichaar kaavy baddh karit rahaa ! Tujhyaa anganaatil shabd fulanni mi kharokhar moharun gelo aahe !! Best Luck ...always !!!

  ReplyDelete
 2. खूप खूप पूर्वी , मी पण चौकट नावाची कविता केली होती.. कॉलेज मध्ये असताना. तुझ्या चौकटी वर ती आठवली ...

  रात्रीच्या अंधारात आपलासा वाटणारा रस्ता
  सकाळ होताच किती निर्जीव वाटू लागतो
  आणि त्यावरून चालणाऱ्या प्रत्येक माणसाकडे
  आपण अनोळखी नजरेने त्रायास्थासारखे पाहतो ...

  असतं त्यातच आपलंही माणूस कोणी कधीतरी
  आपणच बहुतेक त्याला ओळखलेलं नसतं
  आणि त्याच्या नजरेतली ओळख पटेपर्यंत
  बाहेर पुन्हा एकदा अंधारून आलेलं असतं

  ओसाड रस्त्यावर मग, मन परत एकदा फिरून येतं
  आहे का कोणी आपल्यासारखा वेडं, हळूच बघत असतं
  पण आपणच आपल्याभोवती एक चौकट असते आखलेली
  आणि खरंतर त्यापलीकडे पहायचं राहून गेलेलं असतं

  ReplyDelete
 3. मस्तच कविता आणि ब्लॉगही!

  ReplyDelete
 4. जसे कोवळे रंग पानातले
  जसे मोकळे श्वास रानातले
  तसे गावू या, मी म्हणालो.. परंतु..
  तुझे वागणे संविधानातले !!!
  **ज्ञानेश वाकुडकर

  ReplyDelete

Pages