Monday, 28 November 2011

Athvanichya kallolane...
dokyat itka kahr hoto..
ana papnichya ughadzapesarkha..
praharamagcha prahar hoto.

Tuesday, 4 October 2011


आता उरल्या आठवणींचा,
एक एक क्षण आठवायचा.
आणि येणाऱ्या क्षणाला....
समाधान म्हणून जोडायचा.
Here i am completing 200 posts on my blog.Hopefully i will continue and keep meeting u through my words....:)
माग माग मागितल्याने...
प्रेम काही मिळत नाही.
हेही तितकच खरयं..कि..
त्यावाचून आयुष्य काही अडत नाही.

Saturday, 1 October 2011

गुंतणं म्हणजे काय असतं...
हे ठेच लागल्याशिवाय कळत नाही.
आणि कासावीस झालेल्या जीवाच्या तेव्हा..
जखमा व्हायच्या टळत नाही.

Thursday, 29 September 2011

अश्या तडाखी उन्हात ..
माझी एकाकी हि वाट.
साथीला हा सूर्य तापलेला...
अन मला हवीशी...पहाट.

Thursday, 22 September 2011

मला वाटते सहज एकदा..
करार करावा माझ्या शरीराशी.
कापून सारे अंतर आणि..
विलीन व्हावे तुझ्या श्वासाशी.

Wednesday, 14 September 2011

सुर्यास्ताच्या वेळी मला 
दुविधेत पाडू नकोस.

माझ्या चंचल मनाला
निराशा दाखवू नकोस.

पहिले जे स्वप्न मी 
त्यात अडथळे  आणू नकोस.

वाटेवरच वाटसरूचा 
असा प्रवास थांबवू नकोस.

सुर्योदयाची स्वप्ने पाहते मी
मला सूर्यास्त दाखवू नकोस.

हे ईश्वरा तुझाच अंश मी 
छोट्याश्या आयुष्यात क्रियाहिनतेचा डाग लावू नकोस.

Sunday, 11 September 2011

आयुष्यचक्र...

कळी उमलते,
         फुल बनते.
सुगंध पसरवते,
        मनाला प्रफुल्लीत करते.
नंतर कोमजते.
           न सुगंध येतो.
न उरते ती प्रफुल्लता,
        मिटून जाते फुल मग..
आणि भासते असे...
         जसे मानवाचेही होते.
उमलून ,फुलून,
         सुगंध पसरवून
कोमजून, प्रफुल्लून,
         शेवटी मिसळते...
मग राखच..
           फक्त मातीत.
न उरते अस्तित्व,
          न उरतो  सहवास.
प्रत्येकाचं असंच....चालतं 
         ऋतुचक्र,आयुष्यचक्र.

Saturday, 10 September 2011

कश्यासाठी...


कश्यासाठी अपेक्षा करावी  कुणाकडून,
जर एकटाच येतो जन्माला,
अन जातोही एकटच आपण.

रडावसं वाटल्यावर,
खांदा द्यायला कुणीच नसतं.
आपली मतं जाणून घ्यायला,
कुणी इथे रिकामं नसतं.

मग कुणाची साथ कशाला हवी,
एकट वाटल्यावर.
एकटचं रडून घ्यावं आपण,
मन दाटल्यावर.

तुम्ही कुणासाठी धावून गेलात,
पण तुमच्यासाठी धावायला कुणीच नाही.
त्यांच्यासाठी ते काहीही असो,
पण आपलं ते कर्तव्यच असतं.

आपलं,आपले आपणच म्हणतो,
जो तो स्वार्थ बघतो.
फटका बसला,भ्रम गेला कि,
तेव्हा डोळा उघडा होतो.

मग खूप उशीर झालेला असतो तेव्हा,
बिघडलेलं सारं सावरण्यासाठी.
तेव्हा खरं सुरु होतं जीवन,
आपण स्वतःसाठी जपण्यासाठी. 

Sunday, 21 August 2011

जिथे मार्ग नसतो,
नेमकी तिथेच आपल्याला आशा वाटते..
वेडया झालेल्या मनाला फक्त,
खोटया समजुतीची दिशा लागते..

Saturday, 13 August 2011

तुटण्यासाठी लागत नाही..
काही क्षणही नात्याला..
अख्खी आयुष्य उणी पडतात..
मात्र..तीच अलगद जोडायला.

Monday, 8 August 2011

आजसुद्धा माझी पहाट..
रोजप्रमाणेच सुनी होती.
सोबत अंधारलेलं एकटेपण अन.
तुझ्या हव्यासाची आहुती होती.

Wednesday, 3 August 2011

चौकट!

चौकटीत राहू जगणं म्हणजे..
अर्थहीन जीवन,अस्तित्वाचा खेळ.
चौकट तोडून जगणं..म्हणजे..
नियम तोडल्याची भीती,लढाई...
चौकटच ठरवते माणसाचं आयुष्य,
आणि बिघडवतेही  तीच.
चौकट बनते कधी स्वार्थी वृत्ती 
तर कधी नियम ..
माणूस मात्र गोंधळळेला ..
चौकटीतही..आणि चौकटी बाहेरही.

Monday, 25 July 2011

Vedana suddha samjutdarapudhe
Kahi kalach namte.
ani na samjnaryachya manat
badhir houn vahte.

Friday, 24 June 2011

डोळ्यात मावेनासं झालेलं ऊन,
आणि आपल्याच व्यक्तीचं जाणवणारं सततच ऋण.
सारखा टोचतं...तीक्ष्ण काट्यासारखं..बोचतच राहतं.
नको असेल तरी ते मावळत नाही...आपल्याला हवं तेव्हा....
जाणीवा मात्र सदैव...अंधारल्यासारख्या  होतात तेव्हा..लक्ख उन्हातही.
चालण मात्र चुकत नाही तेव्हा.....फक्त या आशेवर चालावं...कि ते ढळेल लवकरच...
त्याचा ढळंण्याचा  काळ काही...ठरलेला नसतो..
पण त्यालाही कधीतरी..वळण्याचा मोहं होत असतो.Tuesday, 21 June 2011

त्याग

दुसऱ्यासाठी त्याग केला कि,
तो त्याची नेमकी.. कदर करत नाही.
आणि आपल्याला त्रास दिल्याशिवाय,
सुखाला चैन पडत नाही.

Thursday, 16 June 2011

ढगं

माझ्या डोळ्यातील पाऊस
तुला खूप-खूप आवडतो...जेव्हा..
 बरसणारा ढग मात्र..
हमसून-हमसून..वेडा होतो तेव्हा


आयुष्यभर..वाऱ्यासारखी..
जिथे तिथे...प्रेम शोधात बसलेली ती.
बेभान...थकलेली..रिकाम्या हातानी..
गर्दीच्या जगात फिरतेच आहे.
समुद्राच्या पाण्याशी खेळतांना लाटांनाही,
साकडे घालणाऱ्या..तीच..सावळ रूप..बेचैन होऊन,
अस्वस्थतेनं किनाऱ्यावर फिरतांना,
ओसाड मनाच्या कप्प्याला कुरवाळतांना,
दूरवर...वाटेला आशेने नजर लावून बसलेली..ती...
छोटीशीच बाहुली..आपल्याला हव्या असलेल्या..त्या प्रेमाच्या शोधात...
अधिरतेत...एकटीच...तारुण्यातही...या आशेने..
कि कधीतरी कदाचित कुणीतरी समजून घेईल..
मनस्तापाचे..झरे तेव्हा वाहणार नाही..
तोपर्यंत असच आपलं..एकटपण..नकोसं...
त्रासदायक...अर्थहीन..वाटणारं..
घाबरायचं ठरवला कि..वादळ 
आपली हाडाच मोडतं.
त्याला रोखठोक उत्तर दिलं कि
आपल्यापासून चार हात दूर पळतं.
अचानक वादळ बनून येणाऱ्या सवालांना..
आजकाल मी..घाबरायचंच सोडलंय.
सुनामी असो कि मग भीष्मप्रश्न..
त्यांनाच मग मी नमावायचं ठरवलय. 

Monday, 13 June 2011

शहाणपणा ...

बाजारी त्याच ...
मी शहाणपणा विकला होता.
जेथे गेली कित्येक वर्ष..
मी क्षणाक्षणाला तो जपला होता.

Wednesday, 1 June 2011

आयुष्याचे डाग...झाकण्याकरिता..
तिने गालाच्या खळीचा वापर केला
जेव्हा अवघड झाले..ते काहीसे..
त्यावर बटीचा पडदा दिला.

Thursday, 26 May 2011

ब्लॉग लिहायला सुरवात केली तेव्हापासून डायरी लिहिणं बंद झालं.आता स्वतःचं काहीही वाचायच झालं तर..आधी ऑनलाईन यावं लागतं.आता कागदांवर लिहिणं सुटलय..अस्ताव्यस्त पडलेली कागद आता कधीच नसतात माझ्याकडे.कंटाळा आला म्ह्णून सुचलं तरी लिहायचं सोडलाय ...काहीश्या ओळी मात्र लिहून होतात..तसेच काही विचारहि....लिहिणं सुद्धा रटाळ वाटतं कित्येकदा.. भावना शब्दात मांडल्या कि..मनातले विचार...त्यात जाऊन बसतात...भावनांचे तात्पुरता स्थलांतर होते ते असे...

Wednesday, 25 May 2011

नेहमी असंच वाटलं..न बोलताच..
तू समजून घेशील सगळं.
आता पुन्हा..एकट बोलणं...
आभाळाशीच ...भांडण सगळं 

Sunday, 22 May 2011

देव..

तसा देव देऊळात आहे,
अन श्रद्धेने भक्ताच्या मनात आहे.
तरी तो जातोच भेटी राऊळाला,
अन श्रद्धेचे प्रतिक हारा-नैवेद्याला.

देतो काहीसे...चलाख आहे,
बदल्यात त्याच्या मनोकामनेचा बदलाच आहे.
थोडेसेच काहीसे हवे सदा त्याला,
अन मग नवसाचे वाचन पुन्हा देवतेला.

येतोच आहे पुढल्या भेटीला,
जरा बघवे..अन सावरावे या घडीला.
देवा असे उपेक्षु नको रे..
तुझ्यावीण कोण मला पामराला?

चाले न जेव्हा नवसाचेहि जेथे,
तेथे दोषाचे खापर नशिबाला.
कोसुन जेव्हा शिणतो बिचारा,
असे पाडसे पुन्हा शरण देवाला.

काय फरक पडतो जर तो पाषाणी आहे,
किंवा कोपऱ्यात मनातील गाढ श्रद्धेच्या?
झेलतोच तोही अगणित मागण्या...
पण जरासा विचारी आहे..बाबतीत कृपेच्या.

तसा देव देऊळात आहे,
अन श्रद्धेने भक्ताच्या मनात आहे.

Saturday, 21 May 2011

तू जवळ असतांना,
तुझ्यावर..रुसव्यांवर रुसवा.
अन तू दूर गेल्यावर,
तुझा भासांवर भास ...फसवा.

Tuesday, 17 May 2011

Praising Is Good!

Praising other's things...is very good.It boosts the person and give courage to him for doing his next best things...i don't understand why people don't give comments to the person's some particular good thing?You don't now how much it affects...but this small things..makes larger differences... don't leave this chance.You will feel satisfied for that too.Hope you get my point..:)
Good day friends!

Monday, 16 May 2011

नुसत्या तुझ्या विचारण्यानेच..
किती जीवात जीव येतो.
  नाहीतर त्या परक्यापणाने..
    अक्खा दिवस कासावीस होतो.

Monday, 9 May 2011

शिकणं...

पावसाकडून शिकावं कुणी..
गर्जून बरसून,रडून घेणं.
आणि अश्रूचा पूर वाह्तानाही..
अक्ख्या धरणी ला सुखावून देणं.

Friday, 6 May 2011

वाटा...


वाटांनाही हजार वाटा..
त्यांच्याच नकळत फुटलेल्या.
काही गोष्टी मनात अश्याच...
पण अगदी खोल रुतलेल्या.

Thursday, 5 May 2011

जाता येता वाटांनाही,
नजर लावण्यात मजा असते.
परतानारं  नसेल कुणी त्यावरून..
तर मात्र सजा ती असते.


Wednesday, 4 May 2011

हक्क...


कोण म्हणतो आपल्याला...आपली वाटणाऱ्या व्यक्तीवर..
आपला पूर्ण हक्क असतो?
तो तितका गाजवू द्यायचा कि नाही...
हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.हाती म्हणे आयुष्याची,
रेषा असते आखलेली...अन...
थकताच लाख उपायाअंती,
नशिबावर ती लादलेली.

Saturday, 30 April 2011
धुंद म्हणजे काय असते हे..
ती उतरल्यावर कळली मला.
माझीच सावली अशी....
हूल देत देत छळंली मला.

Tuesday, 26 April 2011

शाळा..


Reading "shala" by Milind Bokil.....really recommended for reading...it is full of laughter...enjoying alot!
One nice line from it...."आपण बिनधास असलो कि जग आपल्याला काही करू शकत नाही.बिनधास माणूस जणू अदृश्यच होतो."and  it is reality too.what u say?:)

Sunday, 24 April 2011

पाऊस...


भुरभूर पाणी पावसाचे..
अंगावर घेऊन..
हुरहूर लागली मनी..
अंग गेले शहारून..

गेले दूर घेऊन..थोड्या गारा डब्ब्यात..
अन टाकल्या हळूच त्यांना मनातून पोटात..
गोलगोल राणी करून थोडी झिंगले त्याच्यात
चित्ती रूप त्याचे..असा तोही पावसात.

केला पाऊस साजरा..असा..
एकांती ध्यान लावून..
आणि सुकाच वरांडा माझा..
मी मात्र चिंब चिंब त्याच्यात.

Saturday, 23 April 2011

जीर्ण....

जीर्ण झाले जुने विचार...
जीर्ण त्या आठवणी...
कित्ती बदललेत आचार सगळे...
कित्येक केल्या पाठवणी

शाई सुकली...कलम गंजली..
पानही पिवळे पडले.
नव्या युगात इतकी ती रंगली...
पण  न कळले काय दवडले..?

गुलमोहोर सुकला आहे..
मोगरा मात्र फुलला आहे..
जुन्या त्याच त्या ...रस्त्यावरती...
नवा सडा हा पडला आहे.

वळणावरती वळून घ्यावे..
गळता पाने...गळून घ्यावे..
तुफानाला लढून उरावे..
स्वतः स्वतःचे पिलू बनावे..

उठून पळावे त्या जीर्णपणातून..
पळतच राहावे रस्त्यावरती..
उतरू दे नशा त्या रिक्तपणाचा..
कुणी नसेल जर..हाकेवरती.

Thursday, 21 April 2011

नजरेच्या त्या खेळामध्ये..
बाजार करायचाच राहून गेला.
अक्खा दिवस बाजार हिंडून..
शेवटी सुरमयी पाव वाहून गेला.

Wednesday, 20 April 2011

Mazi tyachi najranajar,
akkhya gardine gherli.
Ani mag pahunhi na pahilyasarkhi..
tyanchich najar chorli.::)

Monday, 18 April 2011

Thodyawelapurvi eka wachakane mala dileli pratikriya......
x:hi
Me:hello!hw r u?
x:me chan pan tu....aga....ga.....ga...ga...ga....
me ghabarle.jeev muthit...gheun wat pahat hote pudhachya shabdachi...full tention...kay chukala nakki maza?
x:aga......tu kay lihites ka kay majak kartes?
kasali chan...afhat lihites....
me ajunhi thodi confuse.....
x:aga khup chan lihites..
Me:oh!Thanx.

(manatlya manat 2 mintat tanun thevna bara nahi disat..fakta eka....chan sathi....ata jara...samadhanacha suskara tari sodava mhatla):)

मनसोक्त...

आयुष्य पाण्यासारखं...
तुमच्यासाठी थांबणार नाही.
बोटांच्या छोट्या फटीतून केव्हा निघून जाईल...कळणार सुद्धा नाही.
वाहतंय तोपर्यंत वाहून घ्यावं मनसोक्त.....
अंगावर नुसतं शिंपडून न्हावून घ्यावं मनसोक्त.
मधुर एका धुनीने गावून घ्यावं मनसोक्त..
डोळे मिटून...क्षण अन  क्षण जगून घ्यावं...अन.
वेड्यासारखाच...एकट्यातही  हसून घ्यावं मनसोक्त...
अगदी मनसोक्त... 

Friday, 15 April 2011

तोरणं

तोरणं बांधली तेव्हाच सण साजरे होतात असे नाही.कित्येकदा तोरणाशिवाय आपण सण साजरे करतो.आपल्या मनात आपण सण साजरे करू लागलो कि तिथे तोरणं तयार होतात.आता सणाचं म्हणाल तर आपण ठरवला तेव्हा आपला सण.मनाची अशा पल्लवित झाली कि सगळीकडे हिरवळ दिसते,सणच असतो सगळीकडे.नाहीतर नुसता कडक उन्हाळा आणि पानगळीचा ऋतू दिसेल सगळीकडे.अर्थात मना ठेवा रे पल्लवित,सर्व आनंदाचे कारण!:)
Mala jara welach lagto..
Vadanantar sawarayla.
Mhanun ka kuni dosh deta..
Ektya barastya pavsala?
Manat shantata
thok thok thokli.
kahihi bolaycha nahi..
hi ola karodda ghokli.
kurwalale pratyekwelela..
ti manachi pokli..
niyamcha lavla mag shevti..
tuzyasobat kadhich nahi manachi moklik.

Thursday, 14 April 2011

Kadak dadpanache...
Sobatche te...kshan.
Kahihi bolu naye....
nahitar ghusmatnare agatik man.
Abol shantate.....
Yete ekdach ti lehar.
Sagale niyam todte.....
Akkha baichain hoto prahar.

Wednesday, 13 April 2011

Ugach khote hasu te chehryavarti...
An mag khol khali mazya galavarti.
Kiti kiti re chalale majala..
An me zelale othavarati.

Friday, 11 March 2011


खरं तर आपली सगळी प्रश्न..
आपल्यापासून सुरु होतात.
अन नाईलाजाच्या  नावाने..
उत्तर बनून सुटून जातात.

आपण असाह्य असलो कि,
रागवायचा अधिकार आपल्याला राहत नाही.
आणि रोषाचा ज्वालामुखी मग,
भडभडा वाहायचा थांबत नाही.

Wednesday, 9 March 2011


कुणाची का वाट पहावी...
जो सुखवेल मनाला?
आपण ते सगळं करावं...
जे रिझवेल आपल्या मनाला.

पुढे चालून गेल्यावर..
मागे यायला नकोसं होतं.
म्हणून आधीच वेचून घ्यावं..
जे आपल्याला हवंसं होतं.

रागानंतरच्या मौनापेक्ष्या
त्याआधीचं मौन बरं...
नंतरच्या त्या भयाण शांततेत..
वेड लागतं हे खरं...


कालचा निग्रह कालच मोडलेला..
आजचा दिवस  मात्र....
त्याच्याशी विनाकारण जोडलेला..

Sunday, 6 March 2011


आज तुझी ती गोंधळलेली
निष्पाप पापणी सांगून गेली..
कशी कशी तू..नाव टिकवली..
अनेक तुफाने तारून नेली.

निर्ढावलेल्या मनासारखे...
निर्ढावलेले शब्द...
तरी मला आस तुझी..
आणि मी अशी स्तब्ध.

माझ्या मौनातच सापडेल..
अर्थ तुला सारा..
गरज आहे फक्त मला..
 तुझं मान जरा..

माझं त्याच्यासाठी
असं आसुसलेलं होणं अन..
त्याचं ते शांतपणे
त्याच्यातच हरवलेलं राहणं

Thursday, 3 March 2011


तू असशील रे धुरंधर..
मी आहे मग कलंदर..
थोडं अंदर,थोडं बाहर..
तुझाच आहे जंतर-मंतर


कालच तुझ्यासाठी मी ..
केला नवस कबूल..
तुझ्या डोळ्यात लागली जेव्हा मला..
दुखः ची चाहूल.
तुझे भिरभिर होणे
अन  कातर पाऊल
मला कळेना माझी अशी ..
काय झाली भूल..


कालही तुझ्या त्या चलाखीने..
ढळली होती माझी नाव..
हि मीच कि खचूनही..
शोधून काढला माझा गावं

स्वतः च मुळ विसरलेला व्यक्ती...
वरवर खोट पांघरून घेऊन जगत असतो.
त्याच्या मते पांघराल्यानेच फक्त..
त्याचा "वाल्मिकी" होत असतो.


तू हमी दिलीस म्हणून
खात्रीने पावलं पुढे टाकली
अंधारलेली माझी खोली..
तेव्हा प्रकाशमय वाटली.

कालही मजला..छळून गेला..
लबाड..भयंकर..तुझाच वारा.
कालही विनाकारणच  मग..
वाहत गेल्या अश्रू धारा..

समुद्राच्या एक एक लाटेवर
मांडून येते दुःख सारी..
अन हसून रडते जेव्हा जेव्हा
सांडून येते ओझी भारी..

मोजताच नाही हिशोब आता मी
तू दिलेल्या घावांचे..
अजूनही अस्तित्व जाणवते मला
तू दिलेल्या श्वासांचे..

Tuesday, 1 March 2011


चूरगळलेल्या पानाचं भविष्य
त्याच्या चूरगळंण्यातच कमी होतं.
अन माणसाचं भविष्य....
धुंद उतरल्यावर अचानकच दिसतं

Monday, 28 February 2011

अबोल राहता..छळंते मजला ..
माझेच एकएकटेपन..
असा कसा रे..तू वेगळा.?
माझ्यात न उरते माझेच "मी " पण.
..

ओळख होताच दोन दिसातच मग..
नवीन ओळख... जिवलग होतो.
चार आठवड्यात कडी तुटते..
अन तोच जिवलग मग शोषक होतो..

आणाभाका..वचन सारी...
 नुसतीच..नावापुरती...
आयुष्य सरत नाही..
त्या शपथा आणि शब्दांवरती

तुझ्यापासून दूर अगदी दूर
जायचा मी ठरवलं..अन..
पुढच्याच क्षणी नकळतच
माझं पाऊलं तुझ्याच दिशेनं वळलं

तुझ्यावर रुसायला मला फार आवडतं
हे तू जाणून आहे..मग कुठे खटकत?
रुसण दूर राहत जेव्हा तूझा "मी" पणा आड येतो.
जसा किनारा तहानलेला..पाण्याशिवाय दूर आसुसलेला राहतो .

Sunday, 27 February 2011


काळ सुद्धा तुझंच चुकलं,
पण तू ते स्वीकारलं नाहीस.
माझ सगळं खरं असूनही,
मलाच तू फेटाळलसं.


वाहत्या पाण्याला म्हणे..
वाहण्यासाठी..फक्त दिशा लागते.
आणि थकलेल्या मनाला...
सांभाळून घ्यायला एक नाजूक वाट लागते.


"काल" सुद्धा आजही डोळ्यात
अगदी स्पष्ट तसाच आहे.
त्याचचं नशीब वाईट..
त्याचा काळच तसा आहे.माझ्या डोळ्यात अश्रूचा
एक थेंबही त्यांना नको होता.
असे त्यांचे अति लाड नाही,
प्रेमाचाच तो एक प्रकार होता.

लिहायचं म्हटलं
कि खूप सारा गोंधळ होतो.
लिहायला खूप सुचतं
फक्त हात जरा कमी पडतो.


काल बाबांनी चुकलं म्हणून,
पाठीत धपाटा घातलेला.
आणि काही क्षणात,
चेहरा त्यांचा काळजीने दाटलेला.


बाहेर मनाला शीतलता देणारी..
स्वच्छ,सुंदर पहाट.
मागचं काहीच आठवत नाही,
आठवतो तो फक्त "आज".

सांडलेलं चांदणं,
झेलायचच राहून गेलं.
आज कळतये,
किती जगायचं राहून गेलं.

Friday, 25 February 2011


तुझी गरज असते मला
हे जाणून आहे तुही..
म्हणूनच रागवतो नेहमी..
उगाचच कारण नसूनही..

किती हायसं..वाटतं..
तू आसपास असला कि
नाहीतर श्वास सुद्धा जड होतात..
तू माझ्यावर रुसला कि.

Saturday, 19 February 2011


कसा तुझा खोटेपणाचा..
घडा कधीच भरत नाही..
कित्येकदा ठरवते तुला सुधरावायच..
तरीही मला ते जमत नाही.

जुन्या मैत्रिणीच्या आठवणीत..


सुकलेल्या आठवणीना..
नुसताच ओले झाल्याचा भास..
आज किती दूर आपण..
तरीही दरवळतो आहे आठवणीचा सुवास.

Friday, 18 February 2011डोळ्याच्या किनारयातून तू कधी शिरलाही नाही.
अन मनाच्या रिक्त पोकळ्या कधी तू भरल्याही  नाहीस.
नुसताच वाऱ्यासारखा  जवळ आलास...अन
खोल अंतकरणात शिरून नशा बनुन उरलाहि नाहीस..

काल तुझ्यावतीने मी स्वतःच..केसात कुरवाळीले..
कालही मोगरयाला दुरूनच न्याहाळले..
शोधले तुला कुठे कुठे नाही..?
शांत पाण्यालाही मी चाळवले..

ये जरा बरसून ये...खूप सरी घेऊन ये..
सोडून ये पाश सारे..मुक्त जरा होऊन ये.
मला हवाहवासा तो नशा बन..आणि मोगरा होतात घेऊन ये..
आता येताना माझा फक्त माझ्यासाठीच होऊन ये.


Monday, 7 February 2011

शब्द कसे भिरभिर होऊन नाचतात
नको असले तरी वाहतात..
प्रश्न सुटत नाही तरीही
ते अचानक संपतात..थिजतात.

Sunday, 6 February 2011

तुझी चाहूल लागली असेल त्याला..
म्हणून नाटक करत असेल..
रंगमंच नाही लागत त्याला....
विचारलेलं सगळं खोटं असेल.

~~Being confidance to others is best than being doubt.

Saturday, 5 February 2011

~~People sometimes use the phrase"In this big world" & sometimes use"Small world"..what is the world exactly?:)
~~It is just you,who have everything...:)
~~More u think more u will go mad....
~~If u are getting all which you are planned then u r best! If nt check your willpower & strategies!
~Truth of life is just belive urself and make as strong as u can..
~~U finds me philosophical i.e. because u just failed to uderstand my emotions.
I am happy to make century of my blog.Thats was just because of my papa's dream i have been continually writing poems and my thoughts.These days i really don't feel to write anything.But because of God's  gift i can write everything and on every topic.Although i don't want to write it.I am very happy that i am successful in writing.I will devote all my writing to my parents and if possible i will write always. Celebrating this day!Happy Century.   

Friday, 4 February 2011


जाणार कुठे?..
येणार आहेस पुन्हा माझ्याकडे..
असली कटकट घेणार कोण..
आपल्याकडे?

आणि पाऊस हो.....मुसळधार.


आता तू पाऊस हो..
अन मनाला  ओलं चिंब कर.
कोरडं झालेलं हृदय जरा....
त्याचा अंगण ओलं कर..

शब्द शब्द माझा तू..
तू कविता हो...अन
बसून जा कोपऱ्यात...
 मनाच्या माझ्या.म्हणजे..तुझ्याच त्या..

तू फुंकर हो..कानापाशी ये..
हळूच उब बनून शहाराहि हो..
माझ्या केसात हात फिरव
थोडी रंगतदार स्वप्न सजव..

याआधी झालेलं सगळं विसरून जा.
खरच...मनापासून जमलं तर ..जीव लाव..
तू मला आवड्तोसाच..
तुही कर पर्यंत आवडून घेण्याचा..
 आणि पाऊस  हो.....मुसळधार..

आता तू पाऊस हो..
अन मनाला  ओलं चिंब कर.
कोरडं झालेलं हृदय जरा....
त्याचा अंगण ओलं कर..

फरक तुला जाणवेलच
तुझ्या वागण्याचा माझ्या वागण्यावर
तू विसरलास बहुदा..
मी तुझाच आरसा रे..
कालचा तुझा चेहरा वेगळा
आजचा जरा बरा आहे.
काल लख्ख काळोख होता..
आज हवी असलेली पहाट आहे.

Thursday, 3 February 2011


माझ्या अश्रूंची किंमत..
त्यांच्या मते शून्य आहे.
इथेच कळत ना त्यांच्यासाठी
मी किती नगण्य आहे....


तुझ्याकडून अपेक्षा करायच्या नाहीत..
असं लाख बजावते स्वतःला.
पण पुढच्याच क्षणी..
स्वप्नांच जाळं लागते मात्र विणायला

काल रात्रभर मी नुसतीच
कूस बदलत राहिले..अस्वस्थ होऊन..
तू मात्र झोपला होतास..
परक्यासारखा शांत पडून.

चार चार ओळीनी,
मन फक्त भरत असं...
आयुष्याच्या गीताचं...
पाहिलं कडवं म्हणावं जसं.

Wednesday, 2 February 2011


बोलून टाक तूच आधी
एक घाव-दोन तुकडे कळेल तरी एकदाचं.
"ती" तुला सांगयला येणार नसेल आधी...पण
हसायला कारण आपणच असतं शोधायचं.

Tuesday, 1 February 2011


मी घाबरत नाही खंर तरं..
माझ्यातही लखः प्रकाश आहे "वेगळं करण्याचा".
फक्त थोडा विश्वास डगमगला होता..
तो जगापुढे मांडण्याचा.
हात कापला काय..आणि काळीज कापून दिलं काय..
लोकांना त्याची कदर नसते.
आपल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीवर.. 
त्यांची वटवाघुळाची नजर असते.

गुलमोहोर बघण्याची सवय
नंतर इतकी सुटली होती...
कि जेव्हा मला स्मरण झाले..
त्या जागेवर फक्त त्याची एक काठी होती.

चांगलं वेगळं केलं कि..
लोकं पाय खेचत राहतात..
म्हणूनच अशी स्वप्न फक्त..
कवितेतच सुरक्षित राहतात.

बोलायला खूप सोपं असतं,
असं आयुष्याचं तत्वज्ञान.
प्रत्यक्षात आयुष्यात बघावा लागतो..
कित्येकदा आपला मान-अपमान.


कविता म्हणजे काय ...
गंमत नसते जोडशब्दांची.
शब्द शब्दात झळकणारी,
प्रतिमा असते मनाची.

फुलपाखरासारखं आयुष्यही,
भरभर बदलत जातं.
कालचा दुःख सुद्धा मग,
आजच्या प्रश्नांनी विरुण जातं.

नाईलाजात म्हणे कुठेतरी..
इलाज असतो दडलेला.
तोच आपल्याला दिसत नाही..
म्हणून नाईलाज असतो पडलेला.

Monday, 31 January 2011


आता तुझ्या माझ्या वादाचा..
विषयहि वादातीत झाला आहे.
अन नकोनकोसा वाटणारा कधीच... तो ...
परकेपणा नात्यात आला आहे.
मनातले खोल चढ- उतार
कळे कुणाला ?
कळे ज्याला ..तोच अमृताचा प्याला...
छळे जीवाला....

Sunday, 30 January 2011

नाटकी तुझे प्रेम ते
क्षणभराचे थेंब ते.
त्रासदायक उन ते.
अन नको असलेले ढग ते...

Saturday, 29 January 2011


खोल दरीत का शोधते किनारे.. उगीच ....
 हे मला समजूनही  उमगेना...
धूर्त,बावडी आशा नेहमी..
 मला चकवून या वेताळाचा  नाद सोडेना..

Monday, 24 January 2011

कायदेभंग केल्यासारखी तू..
मला मूडभंगाची शिक्षा देतोस.
आणि दिवसभर शांत राहून..
मला अंदमानच्या कारावासात लोटतोस.

Thursday, 20 January 2011

आता तुम्ही मला
छळायचाच ठरवलं आहे..
मीही मग बळबळ
रडायचं ठरवलं आहे.
कविता काय मला रंगवता येतेच हो
तुम्ही म्हणताय म्हणून लिहायचा ठरवलंय

वेगळ वाटतंय..

आज जरा वेगळं वेगळं वाटतंय,
मन पुन्हा पुन्हा सैरभैर होतंय,
हळवं होऊन ...शांत राहून..
तंद्री लावतय विनाकारण.

कसलेही प्रश्न नाहीत...
म्हटले तर..
कसलाही त्रागा नाही....
पहिले तर...तरीही...
आज जरा वेगळं वाटतंय..

स्वप्न डोळ्यासमोर आहेत..
आणि ध्येय सुद्धा मांडलेली.
आत्मविश्वासाची कमतरता नाही...
आणि पाऊल पुढे टाकण्याचे भयही नाही.
तरीसुद्धा सैरभैर मन..

एक दिवस असा वेगळा...
नुसतच....मुक्त झुलण्याचा....
तल्लीन होऊन कामातच...
कामात गुंतल्याच्या देखाव्याचा...
फुलपाखरासारखं नुसतचं..गिरक्या घेतंय,
आज जरा वेगळच वाटतंय..

आईची आठवण येतीये...
वडिलाची सुद्धा येतीये...
मैत्रिणीची दंग घालायला...
घरचीही येतीये..आणि नाही पण....
कळत नाही नक्की काय पण
काहीतरी वेगळ वाटतंय.Tuesday, 11 January 2011

सिडनी


वातावरणातील उल्हास..मोहक,मादक असतो हे मला ह्या रम्य शहरात आल्यावर अधिकच जाणवू लागलं.जाता-येता ओपेराहाउसचं मोहक दृश्य,ब्रिज,पाणी,कधी ऊन,कधी पाऊस,सुंदर अगणित समुद्र,डोळ्याचं पारणं फेडणारं नैसर्गिक सौंदर्य..हिरवेगार बगीचे मनाला खूप तजेलदार करतात.इथल्या वातावरणात नेहमी एख्याद्या मोठ्या सणाचं स्वरूप असतं.नेहमी काहीतरी कार्यक्रम असतात.स्वतःला गुंतवून घेणं यांच्या रक्तातच आहे.आणि तेही मनोरंजन करत.मला हे जिवंत माणसाचं लक्षण वाटतं.अनोळखी व्यक्तीलाही आदरपूर्वक स्मितहास्य करून त्याची विचारपूस करण्याचं कौशल्य तर अचंबित करणारं आहे.माझे शब्दही कमी आहेत याचा सौन्दर्य व्यक्त करायला.ते फक्त डोळ्यांनी आस्वादण्याचं आणि त्यात साठवून ठेवण्याचं आहे....

Friday, 7 January 2011

हरणं त्याला जमतं..
जो आधीच हरलेला असतो.
नाहीतर रस्त्यावरच्या भेळवाल्यालाही,
जिंकण्याचा अफाट विश्वास असतो.
मजा उलटली तुफानासारखी..
कि सजा होते मित्रा.
जीवन असेलही अवघड थोडं,
तरीही माणूस आहे भित्रा.

ओंजळीत माझ्या मी,
दुवे ठेवलेत जपून.
तेही माझ्याकडे परतलेत पुन्हा,
जे लावले तू हुलकावून.

Thursday, 6 January 2011

आवाज येतोय अजूनही,
त्या बोंबांचा.
वीट येतो तुझ्या त्या,
नकली सोंगांचा.
कश्यास हवा पाठपुरावा,
नकोश्या त्या ढोंगांचा?
 मावळतो तो चंद्र आणि..
माझा तुझ्यावरचा रागही.
पळून जातो अश्यावेळी,
माझ्यावरचा तुझा धाकही

इतकं वाईट खरं तर,
कधीच कुणी नसतं.
वेळ येतेच तशी म्हणून,
त्याचं वेगळं रूप दिसतं.
बंधन मला घातले मी,
तत्वे मला लादली मी.
तरीही माझ्यासाठी..
मुक्त दिशा शोधली मी.
.
डाग दिसतात नेहमी इथे..
चंद्राचे अन मनाचे.
दुर्लक्षित होतात ते ..
केवळ कोमल मनाचे.
रागाची आग लागली कि,
सगळं इथं नष्ट होतं.
नात्यांची पवित्रताही उरत नाही,
सगळं इथे भ्रष्ट होतं.

Tuesday, 4 January 2011

भास आणि श्वास यांचा मेळ कधी होत नाही,
रस्त्यावर चालता चालता खेळ कधी होत नाही,
रंगमंच लागतो रंग उधळायला नाटककाराला,
अन कवीला साधा कागद-पेन पुरतो झूलवायला .

सगळ्याच भावना कागदावर उतरवता येत नाही,
कित्येकदा खोल..मनातलं कुणालाही पाहता येत नाही.
कागद काय वरवरचा आधार...डोळ्यांसाठी असतो..
तरीही कित्येकदा मला तो सख्याच्या खांद्यासारखा भासतो.

Pages