Monday, 5 January 2015

एक वाट सरळ जाते
पुढली वाट दिसत नाही,
नजरेआड असणाऱ्या असंख्य वाटा
पुढे फुटत असतील..
न जाणे कोण कोण तेथे भेटत असतील.
आपली वाट आपण निवडतो,निवडू शकतो..
चुकली वाट तरीही आपण स्वतः 
तिज वळवू,वळवू शकतो..
का करावा शोक चुकल्या हिशोबांचा..
आपण आताहि जिंकू, जिंकू शकतो

Pages