Friday, 9 April 2010

कुणीही थांबत नाही....

पाय  कुणी खेचतये म्हणून,
पळायचं कुणी थांबतं का?
हरलं पुन्हा पुन्हा म्हणून,
लढायचं कुणी थांबत का?
ध्येय दूर असलं तरी,
चालायचं कुणी थांबत का?
स्वप्न तुटले तरी,
बघायचं कुणी थांबत का?

नशीब साथ देत नाही म्हणून,
कुणी मुळूमुळू रडतं का?
आणि कुणाच्या रडण्याने,
नशीब त्याचं त्याचं पळत का?
अडथळयांना  तेव्हद्याच जोमाने ,
टक्कर सगळे देत असतात.
कुणी महान वैगरे नाही,
सगळे तर सारखेच असतात.

टिकून ठेवतो स्वतः वर विश्वास जो,
तोच  विजेता होतो खरा.
नशीब वैगरे काहीही नाही,
मनाचा खेळ असतो सारा.
कधी कधी संधी असूनही,
प्रयत्न नसतो तितका बारा.
संधी आणि प्रय्त्नातच मनुष्य,
तावून-सुलाखून  निघतो खरा.

Pages