Thursday, 3 February 2011



तुझ्याकडून अपेक्षा करायच्या नाहीत..
असं लाख बजावते स्वतःला.
पण पुढच्याच क्षणी..
स्वप्नांच जाळं लागते मात्र विणायला

काल रात्रभर मी नुसतीच
कूस बदलत राहिले..अस्वस्थ होऊन..
तू मात्र झोपला होतास..
परक्यासारखा शांत पडून.

चार चार ओळीनी,
मन फक्त भरत असं...
आयुष्याच्या गीताचं...
पाहिलं कडवं म्हणावं जसं.

Wednesday, 2 February 2011


बोलून टाक तूच आधी
एक घाव-दोन तुकडे कळेल तरी एकदाचं.
"ती" तुला सांगयला येणार नसेल आधी...पण
हसायला कारण आपणच असतं शोधायचं.

Tuesday, 1 February 2011


मी घाबरत नाही खंर तरं..
माझ्यातही लखः प्रकाश आहे "वेगळं करण्याचा".
फक्त थोडा विश्वास डगमगला होता..
तो जगापुढे मांडण्याचा.
हात कापला काय..आणि काळीज कापून दिलं काय..
लोकांना त्याची कदर नसते.
आपल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीवर.. 
त्यांची वटवाघुळाची नजर असते.

गुलमोहोर बघण्याची सवय
नंतर इतकी सुटली होती...
कि जेव्हा मला स्मरण झाले..
त्या जागेवर फक्त त्याची एक काठी होती.

चांगलं वेगळं केलं कि..
लोकं पाय खेचत राहतात..
म्हणूनच अशी स्वप्न फक्त..
कवितेतच सुरक्षित राहतात.

बोलायला खूप सोपं असतं,
असं आयुष्याचं तत्वज्ञान.
प्रत्यक्षात आयुष्यात बघावा लागतो..
कित्येकदा आपला मान-अपमान.


कविता म्हणजे काय ...
गंमत नसते जोडशब्दांची.
शब्द शब्दात झळकणारी,
प्रतिमा असते मनाची.

Pages