To b treted good..my b the only hunger of the huaman being in all the world.isnt it?
माझ्या अंगणात स्वागत आहे तुमचं....माझ्याच शब्दांच्या फुलांनी..तुम्हाला ती आवडतील याची खात्री आहे..खूप लहानपणी मी हे रोपट लावलं..माझ्या वयानुसार तेही मोठं झालंय ...बहर अजूनही येतोय..सडा अजून पडतोय..तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत....नक्की द्या..आणि माझी शब्द फुलं अशीच वेचत राहा..
Thursday, 8 January 2015
Wednesday, 7 January 2015
मन सज्जना!
भर भर भरकटनाऱ्या विचारांना...
कितीही लगाम घालायचा प्रयत्न केला ना,
तरी तंद्री लागतेच....
त्यांना काही काळ वेळ नसतो.
विषय लागत नाही,
तिथे कुणी उगाच टीका करणारा नसतं.
आपल्या मनाचे आपण राजे असतो,
खूपचं भारी असतं असं आपलंपण..नाही का?
Monday, 5 January 2015
Tuesday, 9 December 2014
मन सज्जना!
अशी एका व्यक्तीची कमी..
दुसऱ्या व्यक्तीशी बोलून थोडीच भरते.
व्याकुळता कमी होत नाही..
तडफड कमी होत नाही.
जीवात जीव नाही..आणि
डोळ्याला डोळा नाही.
प्राणापलीकडे जाऊन जीव लावणं..
म्हणजे शाप असतो..मन सज्जना!
Monday, 8 December 2014
Sunday, 19 October 2014
ज्या दिवशी ऑफिसला खूप उशीर होतो त्याच दिवशी नेमकी बसचा पास संपतो..मग पुन्हा त्याला चार्ज करयाला १०-१५ मिनिटे उशीर झाला कि डोक्यावरचा लाल दिवा लागलेलाच असतो.पण एरव्ही स्वतः चा वेळाही न पाळणारे सहकारी डोळे मोठे करतात..चारदा उशिरा येण्याचे कारण विचारून भंडावून सोडतात.कसं ना? वेळेआधी पोहचलं किंवा वेळेत पोहचलं तर यांना पित्त होतं वाटतं. तेव्हा त्यांना काही घेणं देणं नसतं.खरंय ना?
इति ऑफिसमय नमः
Subscribe to:
Posts (Atom)