Wednesday, 25 August 2010

आता जरा तुझ्या प्रेमात ......

आता जरा तुझ्या प्रेमात
झुळूक होऊन वाहू दे.
आता जरा या काळाला
धून म्हणून गाऊ दे.


मी नदी दूर वाहणारी..
मला संथ वाहू दे.
डोंगरदऱ्या पार करून ..
दूर दूर जाऊ दे.


आभाळासारखं मोठं होऊन
तुझ्या धुंदीत राहू दे.
मीठीत तुझ्या मनसोक्त
दंग होऊन जाऊ दे.चंद्र,सूर्य नको मला,
तुझ्या सहवासात राहू दे.
तुझ्यासोबत जीवनाचा..
हा प्रवास पाहू दे.

1 comment:

 1. आता जरा तुझ्या प्रेमात
  झुळूक होऊन वाहू दे.
  आता जरा या काळाला
  धून म्हणून गाऊ दे.

  faarch chhan...

  ReplyDelete

Pages