भणंग चित्र,भणंग स्वप्न,
अन भणंग माझा स्वप्नांचा राजवाडा,
जो सजवतांना उभारला होता मी..
अपेक्ष्यांचा डोलारा.
माझ्या अंगणात स्वागत आहे तुमचं....माझ्याच शब्दांच्या फुलांनी..तुम्हाला ती आवडतील याची खात्री आहे..खूप लहानपणी मी हे रोपट लावलं..माझ्या वयानुसार तेही मोठं झालंय ...बहर अजूनही येतोय..सडा अजून पडतोय..तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत....नक्की द्या..आणि माझी शब्द फुलं अशीच वेचत राहा..
Sunday, 6 June 2010
Monday, 10 May 2010
जगजीत..
परवा जगजीतच्या कॉन्सर्टला गेलो होतो.जगजीत म्हणजे मनाची शांतता...असा हिशोब आहे माझा.त्याच्या संथ,हळुवार आवाजाने मनही शांत होते.आणि त्यातल्यात्यात एकसे एक गझल त्याने सादर केल्या.त्याचा वादक संघ सुद्धा भन्नाट होता.बासरीवादन खूपच सुंदर होते."कौन केहता ही मुहब्बत कि जुबा नही होती.."या गझलने जोरदार सुरवात केली.....प्रेक्षकांनी भरपूर आस्वाद घेतला.शेवटी तर त्याने थांबवल्यावारही फक्त प्रेक्षकांच्या आग्रहाखातर "आहिस्ता आहिस्ता " हि गझल सादर केली..चेहऱ्यावर कसलेही रागाचे,संतापाचे भाव नाहि.वेळेत संपवावं. असा आग्रह नाहि.प्रेक्षकांचे आणि स्वतःचे संपूर्ण समाधान करण्यावर त्याचा भर..तो खरचं कलेचा पुजारी वाटला मला.कार्यक्रम संपूच नाहि असा वाटत होत..इतका तो यशस्वी होता...यशस्वी शब्दापेक्ष्याही जास्त यश खर तर त्याला भेटल होत.माझ स्वप्न पूर्ण झाल....सिंगापूर मध्ये ते शक्य झाला.याचा आनंद होताच.मनात समाधानहि होत.शेवटच्या गझलेला तर त्याच्या वादकांनी कमालच केली ...अफाट जुगलबंदी झाली...स्वर्गीय आनंद होता तो...संपूच नये असा वाटणारा,मधुर,अविस्मरणीय..सुखद.. क्षण!
Sunday, 9 May 2010
दिवस ...
दिवस येतात...दिवस जातात.आठवणींचे शिंतोडे मागे मात्र सोडून जातात.घरासमोरच गवत मात्र..डोलात वाढत असतं...वाढणाऱ्या वयाची जाणीव ते करून देत असत.डोळे उघडून पाहिलं तर सतत काहीतरी बदलत असत.आपण मुद्दाम पाहत नाही म्हणून आपल्याला ते दिसतहि नाही.ऊन-पाऊस,वादळ-वारा..निसर्ग त्याचे खेळ चालू ठेवतो.आपण मात्र आयुष्याची सांगड घालण्यात सदैव मग्न असतो..भरपूर प्रवास झाल्यावर अचानक लक्ष्यात येत...अरे..कधी झाल हे सगळ..काल तर आपण तिकडे होतो..काही काळ धक्का लागल्यासारख आपण जरी वागत असलो.तरी पुढच्याच क्षणी भूत आणि भविष्याशी सांगड मात्र घालता असतो.वर्तमानकाळ दुर्लक्षितासारखा बाजूला असला.. तरी रुसत मात्र नाही.कारण तोच वेषांतर करत असतो...प्रत्येकाच्या मनात डोकावण्यासाठी..
Wednesday, 5 May 2010
नातं..
मनामध्ये दरी पडल्या तर त्या भरून काढण फार अवघड असतं.लाकडाच्या फटी भूश्याने भरता येतात.पण मनात पडलेल्या फटी वेळीच भरल्या नाहीत तर त्या हळूहळू दरी बनत जातात.कुणाचं कुणाशी देण-घेण नसत.उरतो तो कोरडेपणा.आजकाल नात्यातला ओलावा सहसा दिसत नाही.दिसतात ती फक्त ओलं.ओलं म्हणजे दुरून डोंगर साजरा यापेक्ष्या वेगळ काही नाही.आहे त्यापेक्ष्या जे नाहीये ते लपवण अवघड असतं. नातं फार नाजूक असतं.म्हटलं तर कदाचित कापसापेक्ष्याहि मऊ आणि संवेदनशील असतात ती.त्यांना हळुवार जपण हीही एक कला आहे.बऱ्याचदा.. नात्यांमधे गैरसमजूतींचे शिडकावे होत असतात.त्याला वेळीच कोरडा करावा नाहीतर तो चिघळत जातो.आपण ठरवल तसा तो सोडवता येतो.प्रत्येकजण वेगवेगळे पर्याय शोधतो. आणि तो शोधालाच पाहिजे.मला वाटत...
नातं म्हणजे ..
थोड तू समज ..
थोडा मी समजून घेते...
कांदा तू चीर...
फोडणी मी देते.
उगाच भांडलो गड्या.
थोडं समझुन घेऊया का?
का चिडलो?त्यावर..
चर्चा करूया का?
चीडचिडीने काय होतं?
नुसतच बिपी वाढत...
पाऊस आलाय छान त्यात बेभान
होऊन भिजुयात का?
कुणाला का पाडाव मधे?
आयुष्य आपल्या दोघांच..
जरा..कटुता विसरून
एकमेकांना समजून घेऊया का?
पुन्हा एकदा चहा घेऊ,
मनसोक्त गप्पा मारू...
आठवणींची तार छेडून ..
समुद्रकिनारी जाऊया का?
नातं म्हणजे ..
थोड तू समज ..
थोडा मी समजून घेते...
कांदा तू चीर...
फोडणी मी देते.
उगाच भांडलो गड्या.
थोडं समझुन घेऊया का?
का चिडलो?त्यावर..
चर्चा करूया का?
चीडचिडीने काय होतं?
नुसतच बिपी वाढत...
पाऊस आलाय छान त्यात बेभान
होऊन भिजुयात का?
कुणाला का पाडाव मधे?
आयुष्य आपल्या दोघांच..
जरा..कटुता विसरून
एकमेकांना समजून घेऊया का?
पुन्हा एकदा चहा घेऊ,
मनसोक्त गप्पा मारू...
आठवणींची तार छेडून ..
समुद्रकिनारी जाऊया का?
आता
मी ब्लॉग लिहायला सुरवात केली तेव्हापासून डायरीत लिहायचा बंद केलं.आता पेन कागद कमी असतात जवळ...त्याची जागा लॅपटॉपने घेतलीये.फिरून,चक्कर मारून...लिहिण आता बंद झाल.आता लिहिते फक्त तेव्हाच जेव्हा मेल्स चेक करते किंवा लॅपटॉप जेव्हा सुरू असतो.नाहीतर .... सुचलेलही आता मी लिहित नाही.आता आई नसते ओरडायला बस झालं म्हणून...आणि मीही लाडात येत नाही.आता वाचन हि खूप कमी झालये आणि लिहीनही. आता पेन कोरडे झालेत आणि शाईहि तशीच आहे दौतीत.पानही तशीच आहेत.डाय्ररी रिक्त आहे.आता लिहायचं म्हणून ग्यॅलरीत बसत नाही.वेळ भेटला तरीही तो लिहायला नेहमीच वापरत नाही.कधीतरी लिहिते थोडाफार चुकल्यासारखं वाटतं म्हणून. आता..आता सारच बदललय मी आणि आयुष्यहि...आता मी जरा मोठी झालेय स्वीकारल आणि नाकारल तरीही...
Tuesday, 4 May 2010
पाटी आणि ५ पैसे...
पाटी म्हटलं कि आपोआपच लहानपण डोळ्यासमोर येत.पाटी,पेन्सील,दप्तर,खाऊ या सगळ्या एकमेकांशी निगडीत गोष्टी.एकदा असच लहानपणी मला खाऊला ५ पैसे भेटले.त्यावेळी खाऊसाठी ५ पैसे खूप होते.ते मला भेटले ते या अटीवर कि माझा घरचा अभ्यास पूर्ण केल्यावरच मी खाऊ आणावा.मीही आज्ञाधारक होतेच.होकार देऊन मी माझा अभ्यास पूर्ण करायला घेतला.पण तो करताना पैसे हरवू नये म्हणून मी ते पाटीच्या वरच्या कडेत ढकलले होते.अभ्यास पूर्ण झाल्यावर मला ते सापडलेच नाही.खूप शोधले तरीही.पाटी हलवल्यावर ते कुठे तरी पडले असावे.मी वरच्या कडेत ढकलले पैसे सगळ्या कडांत शोधले.अगदी मागून-पुढून.पण काही सापडेना.शेवटी हैराण होऊन खेळायलाहि न जाता मी पुन्हा अभ्यास करायला बसले.ते या आशेवर कि कदाचित ते पैसे कुठल्यातरी कडेने बाहेर येतील.बरेच दिवस उलटले, कित्येक महिने,वर्ष्य गेलीत.ते सापडले नाहीत .त्या नंतर कित्येकदा मला खाऊला पैसे भेटले कितीतरी पटीने जास्त.मी नवीन पाटीही घेतली होती...त्यातही शोधले...हे जाणून होते कि त्यात सापडणार नाही.आजही पाटी दिसली कि मी त्या पाटीत माझे ५ पैसे शोधते.अगदी कडा चाचपडून.हे माहित असूनही कि हि पाटी माझी नाही...आणि आता ते सापडणार नाहीत.
Monday, 3 May 2010
हृदयी वेदना अन,
मुखी त्रास कश्याला?
मनी वंचनांचे,
फास कश्याला?
सावर-आवर तूच,
तुजला कारण...
कुणी न जेथे तुझे
तेथे आस कश्याला?
नको हवे तर ..
पाश कश्याला?
स्वाभिमानाची..
लाज कश्याला?
टोचतात जे घास घश्याला
मनी त्याचा हव्यास कश्याला?
मुक्त विहंगावे आकाशी,
ठेवुनी मधुमास गडे,
विसरुनी सारे किंतु-परंतु,
उमले ओठी तेव्हा,
हास्य गडे.
मुखी त्रास कश्याला?
मनी वंचनांचे,
फास कश्याला?
सावर-आवर तूच,
तुजला कारण...
कुणी न जेथे तुझे
तेथे आस कश्याला?
नको हवे तर ..
पाश कश्याला?
स्वाभिमानाची..
लाज कश्याला?
टोचतात जे घास घश्याला
मनी त्याचा हव्यास कश्याला?
मुक्त विहंगावे आकाशी,
ठेवुनी मधुमास गडे,
विसरुनी सारे किंतु-परंतु,
उमले ओठी तेव्हा,
हास्य गडे.
Friday, 23 April 2010
हितगुज आठवणीचे....
आठवण!आठवण!
कसलीही,कुणाचीहि,कश्याचीही!
छळत असते खूप!
हि चार अक्षरं छोटी पडतात त्याचा विचार करतांना!
मनात प्रश्नांचा काहूर होतो,शरीराचा तापमान वाढत,
नेहमी दुर्लक्षित असलेल्या शरीराचा श्वासही घाबरतो.
आणि हृदयाची धडधड वाढते,नाहीतर शिथिल तरी होते.
लहानपणी जिथे खेळलो,बागडलो तिथल्या त्या जागेची,व्यक्तींची,वस्तूंची आठवण मनात आली कि अचानकच मन हळवं होत.निरागसपणा,खट्याळपणा आठवून आपणच आपल्याला हसत असतो.लपंडाव,पळापळी,चीपिचीपी,दगड कि माती,कॅरम,कोकोनट,बुद्धिबळ,असो कि मामाचं पत्र असो अन गोल गोल राणी इत इत पाणी,कच्चा लिंबू पक्का लिंबू असो.सारेच खेळ खेळलेलो आपण जीवनाच्या खेळात हरणार कि जिंकणार कि तो अर्धवटच सोडणार हे ज्याच्या त्याच्या कर्तुत्वावर किंवा नाशिबावारही ठरतं
नशीब नावाची गोष्ट मला कुणास ठाऊक रुचत नाही.परंतु कित्येकदा विचारांची गाडी नशिबाच्या स्टेशनावर थांबते,खरं तर मी माझ्या मनगटावर विश्वास ठेवते.हाताच्या रेष्या आणि ज्योतीषीवर नाही.कारण ते आपल्या गोंधळलेल्या प्रश्नांचा मार्ग दाखवतात.परंतु पूर्ण साथ देत नाहीत.स्वत:च कर्तुत्व,हातांवर पर्यायाने हाताच्या मनगटावर अवलंबून आहे.यावर माझा पूर्ण विश्वास असल्याने मी उजव्या हाताच्या मनगटाला म्हणजे
क्रियाशीलतेच प्रतिनिधित्व करणाऱ्या हाताला सतत जागृत राहण्यासाठी आणि क्रियाशीलतेसाठीही
काळा दोरा बांधलाही आहे.आणि बरचं काही... असो जसं जसं आपण मोठे होतो,तसं तसं आपण नवीन व्यक्तींना भेटता असतो.कितीही नाही म्हटलं तरी आपल्याला भेटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्या अंतर्मनात असतेच.अश्या आणि अनेक व्यक्तीच्या अनुभवांवरून आपण जीवन शिकत असतो.
आपण तरुणाईच्या जल्लोषात आव्हान स्वीकारीत पुढे जात असतो.पडतो,लढतो,जिंकतो,हरतो.तरीही स्वप्नांच्या अन ईछयांच्या पुर्तीसाठी झटत असतो.त्यावेळी-
कित्येकदा आपल्याला,
आपलाच आभाळ ढगाळलेला वाटतं.
कित्येकदा आपलंच मन,
आपल्याला सुनंसुनं वाटतं.
गुरुवर्य दाखवत असतात ती वाट
तरीही आपल्याला चुकल्यासारखा वाटत.
ध्येयाकडे चालातानाही,
अचानकच भरकटल्यासारख वाटतं.
अश्यावेळी ध्येयाने प्रेरित मनाने,भावनांवर नियंत्रण करून अडथळ्यांचा,खाचखळग्यांचा योग्य अर्थ घेऊन जीवनाच्या सर्वोच्च्य शिखरावर पोहचणे हाच मला मानवी जीवनाचा किंबहुना मानवाचा सर्वश्रेठ गुण वाटतो. प्रत्येकाला हवं ते हवं तेव्हा मिळू शकत नसत किंवा त्याला योग्य वेळी ओळखण होत नसतं.आयुष्यात प्रत्येकाला हजार संधी येतात.पण संधीच सोनं करण फक्त काहींच जमत.कारण आठवणीच्या सहाय्याने अनुभवांचा ताळमेळ घालून आलेल्या संधीशी स्वत :ला जूळवनहि फक्त काहींच जमत.आणि त्याचं आयुष्य सोनेरी होत.अश्या सर्वोच्य स्थान पटकावलेल्या किंवा ध्येय गाठलेल्या किंवा त्याच्या आसपास असलेल्या व्यक्तींनी आठवणी मनसागरच्या शिंपल्यात कोंडून ठेवलेल्या असतात.आणि त्याच्या कठोर परिश्रमाचे फळ ते सुंदर मोतीत करतात. उतारवयाकडे झुकणाऱ्या मानवी मनाना तर त्यांच्या आठवणी सुखदच असतात.त्यांच्या बोलण्याने,वागण्याने,त्यांच्या अनुभवाने जणू ते सांगत असतात.कि -
लहर जेव्हा येते आठवणीची,
सुटतात गाठी तेव्हा भूतकाळाच्या.
क्षणात रमतो बालपणात,
अन क्षणात यौवनात.
आठवणीच्या कावडश्याने,
फिरून येतो म्हातारपणात.
तर ह्या आठवणी साध्या नसतात.त्या ज्याच्या त्याच्या भिन्न-भिन्न असतात.जीवनाच्या शेवटापर्यंत टिकणाऱ्या श्वासासारख्याच इतर गोष्टीसारख्याच अमीट असतात.हृदयावर,खोल,कोरीव,सुंदर असतात त्या.अर्थात ज्याच्या त्याच्या दृष्टीकोणावरहि अवलंबून असत.आठवणी या अनंत असतात.सदैव,अविरत चालणाऱ्या श्वासासारख्या मनातल्या कप्प्यात.जश्या-
आठवणीच्या गगनाला,
गडे किनारे फार,
कोठे कोठे थांबावे ?
असे प्रश्न हजार.
खरं तर आठवण हि एक गोड साठवण असते.आठवण चांगली असो कि वाईट असो.प्रत्येकाच्या मनात ती असतेच.तिचा प्रवास जितका लांब तितकाच तिचा विषयही मोठा.'आठवण 'या चार अक्षरांबाबत खूप काही बोलता येण्यासारखा आहे.त्याबाबत खोल,गूढ,विसःल,मधुर,अविस्मरणीय अश्या कितीतरी शब्दांच्या सहाय्याने साठवता येण्यासारखंहि आहे.परंतु आठवणींना अनुभवाची जोड देऊन पर्यायी उत्तर चांगला यावं म्हणूनच मला वाटते-
रम मानवा तू आठवणीतही,
पण वर्तमानातही जगात रहा.
होळी कर तू वाईटाची,
अन चांगलं तेच स्वीकारत राहा.
मधुर आठवणींच्या साथीनं,
दु:खाला फुंकत राहा.
अनुभव आणि जिद्दीने,
स्वप्न तुझे साकारत रहा.
उत्कर्ष्याच्या शिखरावर पोहच,
आणि मानवतेने वागत जा.
आठवणींच्या कल्पतरूला.
हळुवार गडे जपत राहा.
कसलीही,कुणाचीहि,कश्याचीही!
छळत असते खूप!
हि चार अक्षरं छोटी पडतात त्याचा विचार करतांना!
मनात प्रश्नांचा काहूर होतो,शरीराचा तापमान वाढत,
नेहमी दुर्लक्षित असलेल्या शरीराचा श्वासही घाबरतो.
आणि हृदयाची धडधड वाढते,नाहीतर शिथिल तरी होते.
लहानपणी जिथे खेळलो,बागडलो तिथल्या त्या जागेची,व्यक्तींची,वस्तूंची आठवण मनात आली कि अचानकच मन हळवं होत.निरागसपणा,खट्याळपणा आठवून आपणच आपल्याला हसत असतो.लपंडाव,पळापळी,चीपिचीपी,दगड कि माती,कॅरम,कोकोनट,बुद्धिबळ,असो कि मामाचं पत्र असो अन गोल गोल राणी इत इत पाणी,कच्चा लिंबू पक्का लिंबू असो.सारेच खेळ खेळलेलो आपण जीवनाच्या खेळात हरणार कि जिंकणार कि तो अर्धवटच सोडणार हे ज्याच्या त्याच्या कर्तुत्वावर किंवा नाशिबावारही ठरतं
नशीब नावाची गोष्ट मला कुणास ठाऊक रुचत नाही.परंतु कित्येकदा विचारांची गाडी नशिबाच्या स्टेशनावर थांबते,खरं तर मी माझ्या मनगटावर विश्वास ठेवते.हाताच्या रेष्या आणि ज्योतीषीवर नाही.कारण ते आपल्या गोंधळलेल्या प्रश्नांचा मार्ग दाखवतात.परंतु पूर्ण साथ देत नाहीत.स्वत:च कर्तुत्व,हातांवर पर्यायाने हाताच्या मनगटावर अवलंबून आहे.यावर माझा पूर्ण विश्वास असल्याने मी उजव्या हाताच्या मनगटाला म्हणजे
क्रियाशीलतेच प्रतिनिधित्व करणाऱ्या हाताला सतत जागृत राहण्यासाठी आणि क्रियाशीलतेसाठीही
काळा दोरा बांधलाही आहे.आणि बरचं काही... असो जसं जसं आपण मोठे होतो,तसं तसं आपण नवीन व्यक्तींना भेटता असतो.कितीही नाही म्हटलं तरी आपल्याला भेटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्या अंतर्मनात असतेच.अश्या आणि अनेक व्यक्तीच्या अनुभवांवरून आपण जीवन शिकत असतो.
आपण तरुणाईच्या जल्लोषात आव्हान स्वीकारीत पुढे जात असतो.पडतो,लढतो,जिंकतो,हरतो.तरीही स्वप्नांच्या अन ईछयांच्या पुर्तीसाठी झटत असतो.त्यावेळी-
कित्येकदा आपल्याला,
आपलाच आभाळ ढगाळलेला वाटतं.
कित्येकदा आपलंच मन,
आपल्याला सुनंसुनं वाटतं.
गुरुवर्य दाखवत असतात ती वाट
तरीही आपल्याला चुकल्यासारखा वाटत.
ध्येयाकडे चालातानाही,
अचानकच भरकटल्यासारख वाटतं.
हव्याहव्याश्या वाटणाऱ्या गोष्टी,
मिळता मिळता निसटून जातात मुठीतून तेव्हा,
आकांक्षी मनाला खूप खूप,
खचल्यासारख वाटतं.
खचल्यासारख वाटतं.
गैरसमजांचे रंग जेव्हा,
उडवत असतात आपलेच आपल्यावर ,
तेव्हा मग भावनिक मनाला,
एकट एकट वाटतं.
कित्येकदा....
लहर जेव्हा येते आठवणीची,
सुटतात गाठी तेव्हा भूतकाळाच्या.
क्षणात रमतो बालपणात,
अन क्षणात यौवनात.
आठवणीच्या कावडश्याने,
फिरून येतो म्हातारपणात.
तर ह्या आठवणी साध्या नसतात.त्या ज्याच्या त्याच्या भिन्न-भिन्न असतात.जीवनाच्या शेवटापर्यंत टिकणाऱ्या श्वासासारख्याच इतर गोष्टीसारख्याच अमीट असतात.हृदयावर,खोल,कोरीव,सुंदर असतात त्या.अर्थात ज्याच्या त्याच्या दृष्टीकोणावरहि अवलंबून असत.आठवणी या अनंत असतात.सदैव,अविरत चालणाऱ्या श्वासासारख्या मनातल्या कप्प्यात.जश्या-
आठवणीच्या गगनाला,
गडे किनारे फार,
कोठे कोठे थांबावे ?
असे प्रश्न हजार.
खरं तर आठवण हि एक गोड साठवण असते.आठवण चांगली असो कि वाईट असो.प्रत्येकाच्या मनात ती असतेच.तिचा प्रवास जितका लांब तितकाच तिचा विषयही मोठा.'आठवण 'या चार अक्षरांबाबत खूप काही बोलता येण्यासारखा आहे.त्याबाबत खोल,गूढ,विसःल,मधुर,अविस्मरणीय अश्या कितीतरी शब्दांच्या सहाय्याने साठवता येण्यासारखंहि आहे.परंतु आठवणींना अनुभवाची जोड देऊन पर्यायी उत्तर चांगला यावं म्हणूनच मला वाटते-
रम मानवा तू आठवणीतही,
पण वर्तमानातही जगात रहा.
होळी कर तू वाईटाची,
अन चांगलं तेच स्वीकारत राहा.
मधुर आठवणींच्या साथीनं,
दु:खाला फुंकत राहा.
अनुभव आणि जिद्दीने,
स्वप्न तुझे साकारत रहा.
उत्कर्ष्याच्या शिखरावर पोहच,
आणि मानवतेने वागत जा.
आठवणींच्या कल्पतरूला.
हळुवार गडे जपत राहा.
Subscribe to:
Posts (Atom)