Tuesday 11 March 2014

आपल्याकडे परदेश आणि परदेशातल्या लोकांवर टीकाच जास्त होते. अर्थात मीहि त्याला अपवाद नव्हते. खरं तर हि लोकं काही वेगळी नसतात. संस्कृतीचा फरक असल्याने आपल्याला त्यांच्या काही गोष्टी खटकतात. आणि तश्या त्यांना देखील आपल्या गोष्टी खटकतच असतात. हे माझ्या इथल्या आत्तापर्यंतच्या वास्तव्यावरून आणि स्वानुभवावरून सांगत आहे . सिडनीत ४ वर्ष्यापुर्वी जेव्हा मी आले तेव्हा खूप भांबावलेली होती . बऱ्याच मेहनतीने आणि घरातल्या बसून कंटाळल्याने मी नौकरी शोधण्याचा निर्णय घेतला आणि मला संधी मिळाली. "The Smith Family" च्या मुख्य शाखेत मुख्य विभागात 'मानव संसाधन प्रशासक 'अर्थात ' Human Resource Administrator 'म्हणून निवड झाली. आनंद होता पण खूप ताण होता . आणि इतक्या मोठ्या संस्थेत काम करण्याचा अर्थात नौकरीचाच हा पहिला अनुभव. घाईघाईत माझ्या सोबतीनेच दोन स्त्रिया..ललना  लिफ्ट मधे आल्या. "Hi! Good Morning !" म्हटल्या. अनोळख्या व्यक्तीने स्मितहास्याने अशी चौकशी करणं माझ्यासाठी नवीन असल्यानी मी भांबावली पण दचकत हे"Gm" केलं. पुढच्याच क्षणी "You are late ?"असं विचारलं मी अजूनही तिच्याकडे विचारात बघतच होते ती पुन्हा म्हटली "Because you look nervous " मी म्हटलं "Yes I guess It's my first day here " तिखट मिरची झोंबावी तशी ती ओरडली,"o oo.. Good luck & have a nice day!" मी आपलं "Thank you " म्हटलं. तशी ती हातातल्या ड ब्ब्याकडे बघून म्हटली," whats in your launch box ?you can exchange with my sandwich ?"मी म्हटलं,"That's spicy veg rice" आणि माझा मजला आला म्हणून मी तिला निरोप दिला डब्बा दिला नाही ;)पण नकळत मनावरचा तन गेला. अनोळख्या शहरात अनोळख्य व्यक्तीकडून मिळालेल्या शुभकामनेने मनाला अर्थातच दिलासा मिळालं . तसं…. आपल्याकडे ओळख नसतांना साधा स्मितहास्य देखील मिळणं अवघड असतं. असा त्या क्षणी मला जाणवलं. आणि खरचं लिफ्ट असो कि साधं रस्त्यावरून आपण वाटसरूला बाजूला होऊन दिलेल्या वाटेला हि लोकं भले दिलसे स्मित हास्याने धन्यवाद देतात किंवा सलग शिंका येतांना रेल्वे मध्ये बाजूला बसलेली व्यक्ती जेव्हा ,"are you ok ?" विचारते किंवा साधं बाळासोबत रेल्वेमध्ये जातांना 'pram ' उचलतांना जेव्हा मदतीचे ४ हात समोर येतात किंवा उभे असतात जागा देतात.तेव्हा अनोळख्या माणुसकीची वेगळीच झलक डोळ्यासमोर येते.

अस्मिता 

No comments:

Post a Comment

Pages