Monday, 19 July 2010

पुन्हा कर तू पसारा दोषांचा...

का तुला मी दोष देऊ?
नशिबालाच मी कोसते.


उमगते  जेव्हा कि.. मी एकटीच...
तेव्हा तारे मग मोजते.


बेधुंद तुझ्या प्रेमात,
ठेच  लागताच मग  बावरते


कुणीच नसते हे व्यक्त कराया,
 मलाच  मग मी सावरते.


बेफिकीर,निडर होऊन तेव्हा, 
निराशेला मग डावलते.


पुन्हा कर तू पसारा दोषांचा,
अन चल पुन्हा-पुन्हा मी आवरते.

Sunday, 18 July 2010

जिद्द आहे मनत अजुनही,
आकाश्याला गवसनी घालण्याची.
तुट्ले नाही मी,
आहे पक्क्या निर्धराची.




उठून पुन्हा-पुन्हा.. पंख जरी कापलेस माझे,
मनी असते सदैव ईच्छा..तरिही.. झेप घेण्याची.
फुकट शब्द बोलत नाही....
ताकद आहे सिद्ध करण्याची....




वाटत  नसले खरे तर..
अजमावून पहा....दिसेलच
फिनिक्स इतकिच ताकद आहे...माझ्यात
स्वप्न खर करायची...
विश्वास या शब्दावर ...
विश्वास रहिला नाही आता जरा..
ज्याने दिलासा दयावा,
तोच छळतोय खरा.

Tuesday, 8 June 2010

तू मला समजणार नाही,
ही शक्यता जास्त वाढते आहे.
माझ्या स्वप्नाचं ख़त,
मी माझ्याच हाताने काढते आहे.

पाऊस..

     पाऊस...पाऊस...पाऊस म्हणजे नुसतीच गंमत एवढाच काय ते आठवतंय.कधी काळे गडगडती ढग तर कधी स्वच्छ  आभाळ...मनाला तजेला देणारं.
        लहानपणी पाऊस म्हणजे शाळेला सुट्टी नाहीतर शाळातरी लवकर सुटायची.मग भिजत..भिजत घरापर्यंतचा प्रवास.खूप मजेशीर होते ते दिवस.कुठेही थांबून खेळत बसायचे मैत्रिणींसोबत. चिखल म्हणजे जिवलग मित्र माझा...पावसाळ्यातला.आई बाहेरून ओरडायची.तरीही मी चिखलात खेळायचे...तर कधी मातीची भांडी बनवत बसायचे .भांडी बनवणे     हा माझा आवडता उद्योग होता.
        सायकल आली तेव्हा मात्र मला चिखल नकोसा वाटू लागला.सगळे कपडे खराब व्हायचे चिखला-मातीचे.पावसात बरच वेळ खो-खो खेळल्याचा मात्र मला आजही स्पष्ट आठवतय.शाळेत आम्हला कुणीच तेव्हा रागावलेल नव्हतं.सुट्टीच्या दिवशी तर मुद्दामच पावसात भिजायचे.पायरीवर बसून पाऊस बघत बसायचे.गारा उचलून डब्यात भरून खूप खूप खेळायचे.
       आत्ताच्या पावसात मी प्रत्यक्ष भिजत नाही,खूप खेळत नाही.खिडकीतून मनसोक्त पाहायला मात्र सोडत नाही.प्रत्यक्ष भिजले नाही तरी मनाला तजेला येत असतो.पावसात भिजल्यासारखाच आंनद मात्र येत असतो.त्यातच..भिजतांना दूर मी विचारत निघून जाते.लहानपणीच्या त्या भांड्यांचा आकार अजूनही सुधरवित असते.आत्ता आई ओरडत नाही घरत येण्यासाठी.मीही खिडकीतच थांबते चिखलाची गोष्ट स्मरण्यासाठी.
         चहाचा कप आणि मी पावसाला बऱ्याचदा सोबत असतो.प्रत्येक पावसानंतर मात्र मी मोठी झाल्याचा भास जाणवत असतो.पाऊस मला आवडतो.मात्र ते भास नाही.याची जाणीव झाल्यावर पाय खिडकीजवळून अलगद सरकतो.थोडा वेळ सोफ्यावर बसून अलगद खिडकीकडे वळते.आणि पाऊस जिंकल्यासारखा जोरदार पडत असतो.
तू गेला ज्या दिशेने..
 ती पुन्हा येइल असे नाही वाटत.
डोळ्यात साठले जे पाणी..
 ते पुसुनही नाही आटत.

Sunday, 6 June 2010

भणंग चित्र,भणंग स्वप्न,
अन भणंग माझा स्वप्नांचा राजवाडा,
जो सजवतांना उभारला होता मी..
अपेक्ष्यांचा डोलारा.
आता  माझीच मला समझुन मी घेणार आहे,
आता माझीच मी मला सावरुनही घेणार आहे.
स्व: ताच्या खांद्यावर डोके ठेवता येणार नाही,
तरीही खांद्यावर डोके ठेवल्याचे भास मात्र करून मी घेणार आहे.
उरी वेदनांचा उसासा,उसासा,
पापण्यांना  अश्रूंचा भार हा नकोसा,
नको तेच जेव्हा हे सतत होतेच आहे,
त्याला पर्याय नसतो सहसा आताशा.

Monday, 10 May 2010

जगजीत..

 परवा  जगजीतच्या  कॉन्सर्टला गेलो होतो.जगजीत म्हणजे मनाची शांतता...असा हिशोब आहे माझा.त्याच्या संथ,हळुवार आवाजाने मनही शांत होते.आणि त्यातल्यात्यात एकसे एक गझल त्याने सादर केल्या.त्याचा वादक संघ सुद्धा भन्नाट होता.बासरीवादन खूपच सुंदर होते."कौन केहता ही मुहब्बत कि जुबा नही होती.."या गझलने जोरदार सुरवात केली.....प्रेक्षकांनी भरपूर आस्वाद घेतला.शेवटी तर त्याने थांबवल्यावारही फक्त प्रेक्षकांच्या आग्रहाखातर "आहिस्ता आहिस्ता " हि गझल सादर केली..चेहऱ्यावर कसलेही रागाचे,संतापाचे भाव नाहि.वेळेत संपवावं.   असा आग्रह नाहि.प्रेक्षकांचे आणि स्वतःचे संपूर्ण समाधान करण्यावर त्याचा भर..तो खरचं कलेचा पुजारी वाटला मला.कार्यक्रम संपूच नाहि असा वाटत होत..इतका तो यशस्वी होता...यशस्वी शब्दापेक्ष्याही जास्त यश खर तर त्याला भेटल होत.माझ स्वप्न पूर्ण झाल....सिंगापूर मध्ये ते शक्य झाला.याचा आनंद होताच.मनात समाधानहि होत.शेवटच्या गझलेला तर त्याच्या वादकांनी कमालच केली ...अफाट जुगलबंदी झाली...स्वर्गीय आनंद होता तो...संपूच नये असा वाटणारा,मधुर,अविस्मरणीय..सुखद..  क्षण!

Pages