जिद्द आहे मनत अजुनही,
आकाश्याला गवसनी घालण्याची.
तुट्ले नाही मी,
आहे पक्क्या निर्धराची.
उठून पुन्हा-पुन्हा.. पंख जरी कापलेस माझे,
मनी असते सदैव ईच्छा..तरिही.. झेप घेण्याची.
फुकट शब्द बोलत नाही....
ताकद आहे सिद्ध करण्याची....
वाटत नसले खरे तर..
अजमावून पहा....दिसेलच
फिनिक्स इतकिच ताकद आहे...माझ्यात
स्वप्न खर करायची...
माझ्या अंगणात स्वागत आहे तुमचं....माझ्याच शब्दांच्या फुलांनी..तुम्हाला ती आवडतील याची खात्री आहे..खूप लहानपणी मी हे रोपट लावलं..माझ्या वयानुसार तेही मोठं झालंय ...बहर अजूनही येतोय..सडा अजून पडतोय..तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत....नक्की द्या..आणि माझी शब्द फुलं अशीच वेचत राहा..
Sunday, 18 July 2010
Tuesday, 8 June 2010
पाऊस..
पाऊस...पाऊस...पाऊस म्हणजे नुसतीच गंमत एवढाच काय ते आठवतंय.कधी काळे गडगडती ढग तर कधी स्वच्छ आभाळ...मनाला तजेला देणारं.
लहानपणी पाऊस म्हणजे शाळेला सुट्टी नाहीतर शाळातरी लवकर सुटायची.मग भिजत..भिजत घरापर्यंतचा प्रवास.खूप मजेशीर होते ते दिवस.कुठेही थांबून खेळत बसायचे मैत्रिणींसोबत. चिखल म्हणजे जिवलग मित्र माझा...पावसाळ्यातला.आई बाहेरून ओरडायची.तरीही मी चिखलात खेळायचे...तर कधी मातीची भांडी बनवत बसायचे .भांडी बनवणे हा माझा आवडता उद्योग होता.
सायकल आली तेव्हा मात्र मला चिखल नकोसा वाटू लागला.सगळे कपडे खराब व्हायचे चिखला-मातीचे.पावसात बरच वेळ खो-खो खेळल्याचा मात्र मला आजही स्पष्ट आठवतय.शाळेत आम्हला कुणीच तेव्हा रागावलेल नव्हतं.सुट्टीच्या दिवशी तर मुद्दामच पावसात भिजायचे.पायरीवर बसून पाऊस बघत बसायचे.गारा उचलून डब्यात भरून खूप खूप खेळायचे.
आत्ताच्या पावसात मी प्रत्यक्ष भिजत नाही,खूप खेळत नाही.खिडकीतून मनसोक्त पाहायला मात्र सोडत नाही.प्रत्यक्ष भिजले नाही तरी मनाला तजेला येत असतो.पावसात भिजल्यासारखाच आंनद मात्र येत असतो.त्यातच..भिजतांना दूर मी विचारत निघून जाते.लहानपणीच्या त्या भांड्यांचा आकार अजूनही सुधरवित असते.आत्ता आई ओरडत नाही घरत येण्यासाठी.मीही खिडकीतच थांबते चिखलाची गोष्ट स्मरण्यासाठी.
चहाचा कप आणि मी पावसाला बऱ्याचदा सोबत असतो.प्रत्येक पावसानंतर मात्र मी मोठी झाल्याचा भास जाणवत असतो.पाऊस मला आवडतो.मात्र ते भास नाही.याची जाणीव झाल्यावर पाय खिडकीजवळून अलगद सरकतो.थोडा वेळ सोफ्यावर बसून अलगद खिडकीकडे वळते.आणि पाऊस जिंकल्यासारखा जोरदार पडत असतो.

Sunday, 6 June 2010
Monday, 10 May 2010
जगजीत..
परवा जगजीतच्या कॉन्सर्टला गेलो होतो.जगजीत म्हणजे मनाची शांतता...असा हिशोब आहे माझा.त्याच्या संथ,हळुवार आवाजाने मनही शांत होते.आणि त्यातल्यात्यात एकसे एक गझल त्याने सादर केल्या.त्याचा वादक संघ सुद्धा भन्नाट होता.बासरीवादन खूपच सुंदर होते."कौन केहता ही मुहब्बत कि जुबा नही होती.."या गझलने जोरदार सुरवात केली.....प्रेक्षकांनी भरपूर आस्वाद घेतला.शेवटी तर त्याने थांबवल्यावारही फक्त प्रेक्षकांच्या आग्रहाखातर "आहिस्ता आहिस्ता " हि गझल सादर केली..चेहऱ्यावर कसलेही रागाचे,संतापाचे भाव नाहि.वेळेत संपवावं. असा आग्रह नाहि.प्रेक्षकांचे आणि स्वतःचे संपूर्ण समाधान करण्यावर त्याचा भर..तो खरचं कलेचा पुजारी वाटला मला.कार्यक्रम संपूच नाहि असा वाटत होत..इतका तो यशस्वी होता...यशस्वी शब्दापेक्ष्याही जास्त यश खर तर त्याला भेटल होत.माझ स्वप्न पूर्ण झाल....सिंगापूर मध्ये ते शक्य झाला.याचा आनंद होताच.मनात समाधानहि होत.शेवटच्या गझलेला तर त्याच्या वादकांनी कमालच केली ...अफाट जुगलबंदी झाली...स्वर्गीय आनंद होता तो...संपूच नये असा वाटणारा,मधुर,अविस्मरणीय..सुखद.. क्षण!
Sunday, 9 May 2010
दिवस ...
दिवस येतात...दिवस जातात.आठवणींचे शिंतोडे मागे मात्र सोडून जातात.घरासमोरच गवत मात्र..डोलात वाढत असतं...वाढणाऱ्या वयाची जाणीव ते करून देत असत.डोळे उघडून पाहिलं तर सतत काहीतरी बदलत असत.आपण मुद्दाम पाहत नाही म्हणून आपल्याला ते दिसतहि नाही.ऊन-पाऊस,वादळ-वारा..निसर्ग त्याचे खेळ चालू ठेवतो.आपण मात्र आयुष्याची सांगड घालण्यात सदैव मग्न असतो..भरपूर प्रवास झाल्यावर अचानक लक्ष्यात येत...अरे..कधी झाल हे सगळ..काल तर आपण तिकडे होतो..काही काळ धक्का लागल्यासारख आपण जरी वागत असलो.तरी पुढच्याच क्षणी भूत आणि भविष्याशी सांगड मात्र घालता असतो.वर्तमानकाळ दुर्लक्षितासारखा बाजूला असला.. तरी रुसत मात्र नाही.कारण तोच वेषांतर करत असतो...प्रत्येकाच्या मनात डोकावण्यासाठी..
Subscribe to:
Posts (Atom)