मनुष्याला गूढ गोष्टीत निसर्गताच ओढ असावी असे वाटते.खरच हे जीवन नावच कोडं म्हणजे...कुठलीतरी न संपणारी ओंळ आणि आपण त्याला पूर्णविराम देण्यासारखच झालं कि.विचार असे स्वैर असतात हे मला मी लिहायला लागल्यावर जाणवायला लागलं.मोठमोठ्या महापुरुषांनी आणि संतानी त्याला अतिशय सोप्या पद्धतीने व्यक्त करायचा प्रयत्न केलाय. पण म्हणून कोणी त्यावर विचार करणं थांबवत का? नाही मला नाही वाटत असं मी ह्या कोड्याला उलगडण्याचे सगळे प्रयत्न करत असते.निसर्गाच्या कुठल्या कुठल्या गोष्टीवरून अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असते.पण काही काळानंतर जाणवते कि हे विचार विकारात बदलत चाललेत ..मग मी पूर्णपणे थांबवते.अर्थात काही काळापर्यंतच..तुम्ही काय करतात?
माझ्या अंगणात स्वागत आहे तुमचं....माझ्याच शब्दांच्या फुलांनी..तुम्हाला ती आवडतील याची खात्री आहे..खूप लहानपणी मी हे रोपट लावलं..माझ्या वयानुसार तेही मोठं झालंय ...बहर अजूनही येतोय..सडा अजून पडतोय..तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत....नक्की द्या..आणि माझी शब्द फुलं अशीच वेचत राहा..
Thursday, 9 September 2010
स्वैर
मी जितका जीवनाला जाणायचा प्रयत्न केला ...तितकंच ते मला गूढ वाटत गेलं.
मनुष्याला गूढ गोष्टीत निसर्गताच ओढ असावी असे वाटते.खरच हे जीवन नावच कोडं म्हणजे...कुठलीतरी न संपणारी ओंळ आणि आपण त्याला पूर्णविराम देण्यासारखच झालं कि.विचार असे स्वैर असतात हे मला मी लिहायला लागल्यावर जाणवायला लागलं.मोठमोठ्या महापुरुषांनी आणि संतानी त्याला अतिशय सोप्या पद्धतीने व्यक्त करायचा प्रयत्न केलाय. पण म्हणून कोणी त्यावर विचार करणं थांबवत का? नाही मला नाही वाटत असं मी ह्या कोड्याला उलगडण्याचे सगळे प्रयत्न करत असते.निसर्गाच्या कुठल्या कुठल्या गोष्टीवरून अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असते.पण काही काळानंतर जाणवते कि हे विचार विकारात बदलत चाललेत ..मग मी पूर्णपणे थांबवते.अर्थात काही काळापर्यंतच..तुम्ही काय करतात?
मनुष्याला गूढ गोष्टीत निसर्गताच ओढ असावी असे वाटते.खरच हे जीवन नावच कोडं म्हणजे...कुठलीतरी न संपणारी ओंळ आणि आपण त्याला पूर्णविराम देण्यासारखच झालं कि.विचार असे स्वैर असतात हे मला मी लिहायला लागल्यावर जाणवायला लागलं.मोठमोठ्या महापुरुषांनी आणि संतानी त्याला अतिशय सोप्या पद्धतीने व्यक्त करायचा प्रयत्न केलाय. पण म्हणून कोणी त्यावर विचार करणं थांबवत का? नाही मला नाही वाटत असं मी ह्या कोड्याला उलगडण्याचे सगळे प्रयत्न करत असते.निसर्गाच्या कुठल्या कुठल्या गोष्टीवरून अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असते.पण काही काळानंतर जाणवते कि हे विचार विकारात बदलत चाललेत ..मग मी पूर्णपणे थांबवते.अर्थात काही काळापर्यंतच..तुम्ही काय करतात?
चारोळी
तो अभिमान फुकाचा असतो
अन स्वाभिमानही फुकाचा असतो.
नात्यात ज्या परस्परांच्या .....
अविश्वास सदैव वसतो.
Sunday, 5 September 2010
झाल्या हजार जखमा अन शोषिले इतके..
झाल्या हजार जखमा अन शोषिले इतके,
तरीही नाद सुटे ना त्या बेकार अपेक्ष्यांचा.
जाळून राख झाली कधीच अस्तित्वाची,
तरीही अर्थ लागेना या गूढ जीवनाचा.
मी मलाच केली शिक्षा कित्येकदा,
तरीही सुटता सुटे ना हा गुंता परस्परांचा.
सवाल कसले?मी पाठपुरावाच केला,
तसा आदेशच होता मला, माझ्याच भावनांचा.
चालली नाव कोठे ?..वल्हे कधीच पडले,
नुरले न गाव माझे अन मागमोस किनाऱ्याचा.

Sunday, 29 August 2010
Wednesday, 25 August 2010
आता जरा तुझ्या प्रेमात ......
आता जरा तुझ्या प्रेमात
झुळूक होऊन वाहू दे.
आता जरा या काळाला
धून म्हणून गाऊ दे.
मी नदी दूर वाहणारी..
मला संथ वाहू दे.
डोंगरदऱ्या पार करून ..
दूर दूर जाऊ दे.
आभाळासारखं मोठं होऊन
तुझ्या धुंदीत राहू दे.
मीठीत तुझ्या मनसोक्त
दंग होऊन जाऊ दे.
चंद्र,सूर्य नको मला,
तुझ्या सहवासात राहू दे.
तुझ्यासोबत जीवनाचा..
हा प्रवास पाहू दे.
झुळूक होऊन वाहू दे.
आता जरा या काळाला
धून म्हणून गाऊ दे.
मी नदी दूर वाहणारी..
मला संथ वाहू दे.
डोंगरदऱ्या पार करून ..
दूर दूर जाऊ दे.
आभाळासारखं मोठं होऊन
तुझ्या धुंदीत राहू दे.
मीठीत तुझ्या मनसोक्त
दंग होऊन जाऊ दे.
चंद्र,सूर्य नको मला,
तुझ्या सहवासात राहू दे.
तुझ्यासोबत जीवनाचा..
हा प्रवास पाहू दे.
Wednesday, 18 August 2010
कविता उमलताना ...
कविता सुचण हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.ती सुखद आणि अर्थपूर्ण वाटणं हे जितका महत्वाचं तितकच ते मांडणही अवघड असते.मला ही दैवी देणगी वाटते.कविता अशीच कुणालाही सुचत नाही.लहानपणी शाळेच्या पुस्तकातल्या कविता समजायला लागल्या तेव्हा कळेना ते इतका सोपं असतं आणि हे भाग्य मलाही लाभेल असं.मोहक ओळी आणि अर्थपूर्ण शब्दांनी मला कवितेच आकर्षण वाटायला लागलं.आणि मग मी कवितेच्या प्रेमात पडले समजलेच नाही.आणि मग अश्या ऋतूतच मला पहिली कविता सुचली,जमली,आणि मला परितोषीकही जाहीर झाले.त्यासाठी जाहीर झालेले १०१ रुपये आणि ढाल आमच्या कंजूस शाळेने कधीच दिले नाही.हे एक वेगळंच प्रकरण...पण मला तो सुखद धक्का होता.त्यावेळी मी ८ व्या इयत्तेत होते.त्यांनतर शाळेत मला फारच भाव आला होता.माझी पहिली कविता ही अतिशय विनोदी होती आणि ती 'उंदीरमामा'वर होती.आता ती मला नीटशी आठवत नाही.त्याचा कारणही सांगतेच तुम्हला.पण ती आज जितकी आठवते तितकी अशी होती...
उंदीरमामा
उंदीरमामा
एक होता उंदीरमामा,
नाव त्याचे रोम्या,रोम्या.
एकदा वाजली त्याला थंडी,
अंगात घातली छोटीशी बंडी.
तेव्हाच तो डॉक्टरांकडे गेला,
नाव त्याचे डॉक्टर मनी.
डोके ठेवून छातीवर,
ठोके मोजते मनी फार.
........................
.........................
...................
...................
बाहेर येऊन म्हणते कशी,
डॉक्टर गेलेत फिरायला.
आता यातली बरीच कडवी मला आठवत नाही.त्यानंतर मी बरच लिहायला लागले.पण त्यामुळे माझे अभ्यासाकडे दुर्लक्ष्य झाले.त्यामुळे आई मला एकदा चांगलीच रागवली.आणि तिने अभ्यासाकडे पूर्ण लक्ष्य देण्याची सक्त ताकीद दिली.आणि कविता लिहिण बंद करायला लावलं.आणि एके दिवशी संतापात मी कचऱ्यासोबत कवितेची वही जाळून टाकली.ती या निर्धारणे कि आता पुन्हा मी कधीही लिहिणार नाही.पण ते मला जमला नाही.आणि अडीच वर्ष्यानी मी पुन्हा लिहिणं सुरु केलं. मात्र आता मी नुसते कविता लिहित बसायचे नाही.सुचलेलं.. जमेल तेव्हा जमेल तितका लिहून ठेव्याला लागले.त्यांनतर मला त्यामुळे सूत्रसंचालन करतांनाही सटासट हवं तेव्हा हवा ते टाकता यायला लागलं.यामुळे मला आयतीच संधी मिळू लागली आणि कौतुकासाहित.हा इतिहास नुसता कवितेचा नाही..तर लेख आणि कथा यांचाही आहे.मी त्यातही यशस्वी झाले.त्यावेळी मी वाचन खूप वाढवलं होतं.एक इथे नमूद करेन कि उत्तम वाचन हे तुमच्या उत्तम लेखनाचं कारण असू शकत अथवा असतच.आणि तुमच्या उत्तम प्रकृतीच आणि विचारांचही.अति अलंकारिक रचना करण मला स्वतःलाकधी आवडल नाही.लिहिणं ही एक गंमत वाटते.आणि अभिमानास्पदही वाटते.कधी कधी बरच काळ सुचत नाही...आणि प्रत्येक वेळेला चांगलं सुचेलंच असं नाही.पण जमेल तेव्हा मला मी शब्दातून व्यक्त करते.आणि मग ते मला हवं तसं अचूक जमलं म्हणजे मी आनंदाने भरारी घेते.शब्दांसहित,कवितेसाहित ..अर्थासहित..
मनातल्या हजार बाता,
मांडत असते शब्दात जेव्हा,
गगनी घेते उंच भरारी
एक-एक रचना उमलते तेव्हा.
लिहिण्याचा आस्वाद वेगळा,
अन एक-एक शब्दाचा स्वाद वेगळा.
मी जे लिहिते त्यातही रंगते ..
अन जे वाचते त्यातही.
होऊन तेव्हा रंगपरी मी,
खेळत बसते रंगसोहळा.
आईने मला नंतर कौतुकाची थापही दिली.आणि न थकता माझा कौतुकही ऐकून घेतलं..परंतु माझं कौशल्य तिला पारखून घ्यायचा होतं असं जेव्हा तिने सांगितलं...तेव्हा माझ्या कविता उमलण्याच्या सोहळ्याला खरा बहर आला....तो आजही चालू आहे अविरत...
Tuesday, 20 July 2010
कळले मलाच नाही....
कळले मलाच नाही,
मी गुंतले तुझ्यात केव्हा.
स्वप्नात तुझ्या वेगाने,
मग मन रमले केव्हा?
तू प्याला मद्याचा...
मी प्राशन केला केव्हा?
अन रसिक होऊन तुला
गाण्यात गायले केव्हा?
मदमस्त तुझ्या धुंदीत ,
फिरले जग जेव्हा-जेव्हा,
देश्यात आढळले मजला, मीच..
नक्षत्रांच्या तेव्हा- तेव्हा.
मी गुंतले तुझ्यात केव्हा.
स्वप्नात तुझ्या वेगाने,
मग मन रमले केव्हा?
तू प्याला मद्याचा...
मी प्राशन केला केव्हा?
अन रसिक होऊन तुला
गाण्यात गायले केव्हा?
मदमस्त तुझ्या धुंदीत ,
फिरले जग जेव्हा-जेव्हा,
देश्यात आढळले मजला, मीच..
नक्षत्रांच्या तेव्हा- तेव्हा.
Monday, 19 July 2010
पुन्हा कर तू पसारा दोषांचा...
का तुला मी दोष देऊ?
नशिबालाच मी कोसते.
उमगते जेव्हा कि.. मी एकटीच...
तेव्हा तारे मग मोजते.
बेधुंद तुझ्या प्रेमात,
ठेच लागताच मग बावरते
कुणीच नसते हे व्यक्त कराया,
मलाच मग मी सावरते.
बेफिकीर,निडर होऊन तेव्हा,
निराशेला मग डावलते.
पुन्हा कर तू पसारा दोषांचा,
अन चल पुन्हा-पुन्हा मी आवरते.
नशिबालाच मी कोसते.
उमगते जेव्हा कि.. मी एकटीच...
तेव्हा तारे मग मोजते.
बेधुंद तुझ्या प्रेमात,
ठेच लागताच मग बावरते
कुणीच नसते हे व्यक्त कराया,
मलाच मग मी सावरते.
बेफिकीर,निडर होऊन तेव्हा,
निराशेला मग डावलते.
पुन्हा कर तू पसारा दोषांचा,
अन चल पुन्हा-पुन्हा मी आवरते.
Sunday, 18 July 2010
जिद्द आहे मनत अजुनही,
आकाश्याला गवसनी घालण्याची.
तुट्ले नाही मी,
आहे पक्क्या निर्धराची.
उठून पुन्हा-पुन्हा.. पंख जरी कापलेस माझे,
मनी असते सदैव ईच्छा..तरिही.. झेप घेण्याची.
फुकट शब्द बोलत नाही....
ताकद आहे सिद्ध करण्याची....
वाटत नसले खरे तर..
अजमावून पहा....दिसेलच
फिनिक्स इतकिच ताकद आहे...माझ्यात
स्वप्न खर करायची...

Subscribe to:
Posts (Atom)