Sunday, 20 December 2009

मन दाटलं तेव्हा....

मन दाटलं,
तेव्हा आभाळही दाटलं होतं.
काही विचार करण्याआधी,
अंगण ओलं झाला होतं.

क्षणात पसरला गारवा,
म्हणून आतून बाहेर गेली,
निसर्ग होतं बहरलेला ,
मळभ थोडी दूर झाली.

हा निसर्ग कृपा करतो,
आणी तोच करतो नाश.
भरले घडे पापाचे ,
मग मानवाचा होतो विनाश.

हा अचानक येणारा पाऊस,
खूप काही सांगून जातो.
लढत राहावं थकलं तरी,
नाही तर माणूस हारून जातो.

अविरत पडणाऱ्या पावसाबरोबर,
उनही आलं होतं,
क्षणभर विसरली साऱ्या वेदना,
म्हणून मनही तजेलदार झाल होतं.

1 comment:

  1. a 2 z uttam lkhan.........khup divsani itke fresh vachle...

    ReplyDelete

Pages