Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Sunday, 20 December 2009

मन दाटलं तेव्हा....

मन दाटलं,
तेव्हा आभाळही दाटलं होतं.
काही विचार करण्याआधी,
अंगण ओलं झाला होतं.

क्षणात पसरला गारवा,
म्हणून आतून बाहेर गेली,
निसर्ग होतं बहरलेला ,
मळभ थोडी दूर झाली.

हा निसर्ग कृपा करतो,
आणी तोच करतो नाश.
भरले घडे पापाचे ,
मग मानवाचा होतो विनाश.

हा अचानक येणारा पाऊस,
खूप काही सांगून जातो.
लढत राहावं थकलं तरी,
नाही तर माणूस हारून जातो.

अविरत पडणाऱ्या पावसाबरोबर,
उनही आलं होतं,
क्षणभर विसरली साऱ्या वेदना,
म्हणून मनही तजेलदार झाल होतं.

Wednesday, 18 November 2009

प्राण

गूंतले मी तुझ्यात इतके,

की तुच माझे अस्तित्व झालास.

शब्द,सुर्,स्वप्न माझे,

तुच त्याचा सम्राट झालास.



तु माझ्या नज्र्रेतुनी,

मग श्वासत अन ह्रदयात आलास.

उरते न उरते मग काही ते,

तु कणा-कणांतुन भासलास.



हे भास नव्हते सत्य ते,

तु माझ्या मनात वसलास.

इतके होते सत्य की,

तुच माझा प्राण झालास.

Pages