माझ्या अंगणात स्वागत आहे तुमचं....माझ्याच शब्दांच्या फुलांनी..तुम्हाला ती आवडतील याची खात्री आहे..खूप लहानपणी मी हे रोपट लावलं..माझ्या वयानुसार तेही मोठं झालंय ...बहर अजूनही येतोय..सडा अजून पडतोय..तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत....नक्की द्या..आणि माझी शब्द फुलं अशीच वेचत राहा..
Thursday, 21 January 2010
संधीची वाट पाहत बसल कि हुकत असते....
सध्याचे दिवस म्हणजे खूप कंटाळवाणे वाटताये.काहीतरी करायचं आहे.पण नक्की काय हे समझत नाहीये.सध्या सगळेच छंद दुर्लक्षित आहेत.वाचनाला तर पार विसरून गेले आहे मी.पुस्तक जवळ असूनही वाचन होत नाहीये.सगळे कौशल्य पणाला लावून काहीतरी सिद्ध करायचं हे मात्र डोक्यात पक्कं आहे.नवीन वर्ष्याची नियमावली तर खूप मोठी आहे.खर तर मी माझी स्वप्ने लवकरच पूर्ण करेल यावर माझा प्रचंड विश्वास आहे पण कदाचित योग्य वेळेची गरज आहे.परवाच एका सेमिनार गेली होती.सेमिनार व्यवसाय व्यवस्थापनावर आहे अस मला सांगितलेले होते.पण तो खूप कंटाळवाणा होता.परंतु शेवट खूप छान गोष्टीने झाला .गोष्ट अशी होती कि एकदा एका शेतकऱ्याची मुलगी एका मुलाला खूप आवडते.तो तिच्यासाठी शेतकऱ्याकडे मागणी घालतो.शेतकरी म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही.पण एक अट आहे माझ्याकडे ३ बैल आहेत.त्यापैकी एकाची जरी शेपटी तू पकडून दाखवली,तर मी तुझं लग्न माझ्या मुलीशी लावून देईल.ठरल्याप्रमाणे शेतकरी ३ बैल मुलासमोर आणतो.बैल खूप धिप्पाड असतात.पहिला बैल त्याच्यासमोर यायला लागतो तर त्याला पाहून हा घामेघूम होतो आणि मनात ठरवतो.कि याला जाऊद्या पुढचा बैल आला कि त्याची शेपटी पकडून दाखवू.दुसरा बैल आल्यावरही तो घाबरला आणि माघे सरकला.आता त्याच्याजवळ एकच संधी होती.तिसरा बैल आला तो शांत वाटत होता.त्याला वाटला आता तो जिंकेल याच संधीची नात आपण वाट पाहत होतो.बैल जवळ आल्यावर तो शेपटी पकडायला पुढे झाला तर काय?त्याला शेपूटच नव्हती.मग तो पश्चाताप करत बसला अरे अरे २ संधी मला आधी भेटत होत्या.मी उगाच पुढच्या संधीची वाट पहिली.थोडक्यात काय तर संधीची वाट पाहत बसल कि हुकत असते. गोष्ट छोटी होती पण सुंदर होती आणि प्रभावी होती.आपणही बऱ्याचदा असच करतो.हे गोष्टा एकूण मी सेमिनारच्या शेवटी आनंदाने बाहेर पडली.आणि पुन्हा एकदा जोमाने स्वप्नांचे दुनियेत शिरली,कि जी लवकरच सत्यात उतरतील.
Subscribe to:
Posts (Atom)