का तुला मी दोष देऊ?
नशिबालाच मी कोसते.
उमगते जेव्हा कि.. मी एकटीच...
तेव्हा तारे मग मोजते.
बेधुंद तुझ्या प्रेमात,
ठेच लागताच मग बावरते
कुणीच नसते हे व्यक्त कराया,
मलाच मग मी सावरते.
बेफिकीर,निडर होऊन तेव्हा,
निराशेला मग डावलते.
पुन्हा कर तू पसारा दोषांचा,
अन चल पुन्हा-पुन्हा मी आवरते.