शब्द जिव्हारी लागे लागे,
शब्दच देती अपार माया.
शब्द सुगंधी सडा मोगरा,
अन तेच शस्त्रही मुखवटे ओळखाया.
शब्द जप-जप साधू संतांचा,
शब्द कातीली गुन्हेगारांचा.
शब्द मलमली आपलेपणाचा,
अन खोल घाव त्या खुमशी प्रवृत्तीचा.
शब्द हास्य कोवळ्या गालांचा,
शब्द गंज अपरिवर्तनाचा.
शब्द असे प्रमादहि ..शहाणपणातला,
शब्द पुरावा जिवंतपणीचा..
वाहे हा शब्द्झरा.... शब्द झरा.