Wednesday 22 September 2010

जशी संध्याकाळी,
मी गायले इतके.
भलतेच निघाले धागे,
मग स्वप्न पहिले इतके.


सवयीचे झाले आता,
एकटेपणाचे  हे छळणे.
अश्रू मुठीत झेलून,
हुंदक्यातच सतत हे जळणे.



मी शोधले किनारे जितके,
परतवले तुही मला तितके.
तो धन्य 'पतंग' आहे,
ज्याच्या जळण्याने मन हळहळते.


मी फेरीले पाणी,
त्या आसेवर ज्यास मी झुरते,
हाय तिची इच्छाशक्ती,
तितकीच दमदार मला ती स्फुरते.

पाऊलखुणा

वर्तमानकाळात चालून गेलो,
तरी भूतकाळात जातांना.
आठवतील काही पाऊलखुणा तुला,
आपण मनसोक्त रमतांना.


वेळ कापरासारखी भुर्रकन उडून जाते,
उगाच प्रयास करतो आपण
तिला थांबवतांना.
तरीही स्मरशील तुही कदाचित 
हि एक गोड आठवण 
मी असतांना ...नसतांना.


मी जपणार आहे हेही शिंपण,
म्हणजे सापडेल पुन्हा डोकावतांना.
असे कितीतरी क्षण घालवलेत आपण ,
आत्तापर्यंतचा प्रवास करतांना.

Pages