Thursday 6 September 2012


नजर हटली,
हौस फिटली.
क्षणभर तरी..
धुंदी तुटली.
रोखून धरलेली नजर,
हळूच डोळ्याने पापणी मिटली.

इतकं कसं हरवून जाणं?
बुब्बुळात चित्र कोरून ठेवणं?
स्वप्न अशीच असतात सारी,
पाहत पाहत रमून राहणं.

एक डोंगर  दुरवर असतो,
 जो फक्त  आपल्याला दिसतो .
इतर कुणालाही दिसत नाही,
क्षणभर आपणही फसतो.

रोखून धरावा श्वास अणि
वल्ह्वावे वल्हे जीव एकवटून .
धाड़सचे काही क्षणच टाकतात.
अक्खे जीवन पालटवून.

Wednesday 18 July 2012

आता फक्त ..


आता फक्त नहात राहावं,
आल्या सरीत चिंब. 
आता फक्त गात राहावं,
होईल तितका दंग.

लागणार नाही आरसा आता,
पाहण्या प्रतिबिंब.
डोळ्यासमोर अक्खी चित्रफित,
आणि समाधिस्थ अंग...


आता दूर दूर..किनारा आणि,
त्यात हलकेच उठणारे तरंग.
रोखून धरावे श्वास आणि,
उधळून द्यावे द्वंद.

आता पहाट बोलत नाही,
पसरत नाही "तो" सुगंध.
अक्खा प्रहर सरतो असाच,
आणि मग पसरतात निशेचे रंग.


आता अनुभवांचे वय झाले,
जपून असते काही ऋणानुबंध.
आणि मग मधूनच अल्लड होऊन..
झेलून घेते हवेसे हवेसे  रंग.

Monday 21 May 2012

जाळं


सुटतच नाहीत प्रश्न काही,
नुसतं विचारांचं जाळं वाढतं.
आपला मन आपल्याच नकळत,
भर गर्दीतलं पाऊल काढतं.

Thursday 15 March 2012


फुलाचेच  आता  फुलाला  कळेना 
कळीचे  फुल  झाले  कसे  ते..
धुंदीत  या  यौवानाच्या
आली  कुठून  अन..जाते  कुठे  ते.

Sunday 12 February 2012


आपण गातो तीच रात 
आपली राहत नाही
आपण झटतो तीच साथ 
आपली राहत नाही

क्षणाला कोसतो ती 
नाती आपली राहत नाही
दोन घडीच्या डावात..
आपला जीव आपला राहत नाही

तुटणाऱ्या ताऱ्याकडच्या
मागणीलाही अर्थ उरत नाही 
आणि चंद्रात  पाहणारी
प्रतिमाही आपली उरत नाही.

कण अन कण मानतो ज्यात
तोच कणही आपला उरत नाही
श्वास उधार ठेवतो ज्यासाठी
तोही आपला राहत नाही

अपार जीव लावतो ज्यांना 
तेच आपले उरत नाही
अश्यावेळी नात्यांना मग 
काहीच अर्थ उरत नाही

आपल्याला हक्क वाटणारी
 नाती जेव्हा उरत नाही
डोळ्यातील अश्रू पुसायला
रुमाल तेव्हा पुरत नाही

भरभरून दिली साथ ज्यांना
तेच जेव्हा झुगारतात
तेव्हा मग पाहायला आराश्यातही
अस्तित्व आपले उरत नाही


आता अर्जुनाप्रमाणे मला 
फक्त एक डोळा दिसतो ध्येयाचा 

आणि रस्ताही आहे माझा 
दूर दूर हा काट्यांचा

मनात माजलाय काहूर
 भरकटलेल्या वाटांचा 

आशीर्वाद आहे पाठीवर जरी 
थरथरणाऱ्या  हातांचा 

पण प्रचंड आत्मविश्वासाने 
यश डोंगर आहे गाठायचा 

तेव्हा कुठे जिभेला 
लावली मी धार होती
न तलवार लढायला
न मशाल होती.


तेव्हा कुठे जिभेला 
लावली मी धार होती
न तलवार लढायला
न मशाल होती.

आता....


मी वळतेच आहे इथून
तुही वळ आता 
सोबत चालले काही पावले 
तेच जगायला बळ आता

मी वळवलेच आहे मन 
तुही तुझे वळव आता 
जपुयात हृदयात हळुवार 
हे बंध आता 

मी जपतेच आहे मला
तुही तुला जप आता 
करू नये कुणीही मनात
कसलीही खंत आता 

मी टाळतेच आहे हृदयचे पाश 
तुही सारे टाळ आता
एकवटुनी सारी शक्ती
मिळवू या ध्येय आता.
.

आता नाहीच पाहणार वळून 
फक्त तुझा हात दे

कोरड्या शब्दांचे फवारे नाही
आपुलाकीपूर्ण साथ दे

ध्येय म्हणजे जाणतेच मी
फक्त धावण्याला वेग दे

सज्ज आहे उडण्याला 
पंखात मात्र बळ दे 

वरवर नात्याचा देखावा नको
जगण्याला अर्थ दे



Pages