मनामध्ये दरी पडल्या तर त्या भरून काढण फार अवघड असतं.लाकडाच्या फटी भूश्याने भरता येतात.पण मनात पडलेल्या फटी वेळीच भरल्या नाहीत तर त्या हळूहळू दरी बनत जातात.कुणाचं कुणाशी देण-घेण नसत.उरतो तो कोरडेपणा.आजकाल नात्यातला ओलावा सहसा दिसत नाही.दिसतात ती फक्त ओलं.ओलं म्हणजे दुरून डोंगर साजरा यापेक्ष्या वेगळ काही नाही.आहे त्यापेक्ष्या जे नाहीये ते लपवण अवघड असतं. नातं फार नाजूक असतं.म्हटलं तर कदाचित कापसापेक्ष्याहि मऊ आणि संवेदनशील असतात ती.त्यांना हळुवार जपण हीही एक कला आहे.बऱ्याचदा.. नात्यांमधे गैरसमजूतींचे शिडकावे होत असतात.त्याला वेळीच कोरडा करावा नाहीतर तो चिघळत जातो.आपण ठरवल तसा तो सोडवता येतो.प्रत्येकजण वेगवेगळे पर्याय शोधतो. आणि तो शोधालाच पाहिजे.मला वाटत...
नातं म्हणजे ..
थोड तू समज ..
थोडा मी समजून घेते...
कांदा तू चीर...
फोडणी मी देते.
उगाच भांडलो गड्या.
थोडं समझुन घेऊया का?
का चिडलो?त्यावर..
चर्चा करूया का?
चीडचिडीने काय होतं?
नुसतच बिपी वाढत...
पाऊस आलाय छान त्यात बेभान
होऊन भिजुयात का?
कुणाला का पाडाव मधे?
आयुष्य आपल्या दोघांच..
जरा..कटुता विसरून
एकमेकांना समजून घेऊया का?
पुन्हा एकदा चहा घेऊ,
मनसोक्त गप्पा मारू...
आठवणींची तार छेडून ..
समुद्रकिनारी जाऊया का?
माझ्या अंगणात स्वागत आहे तुमचं....माझ्याच शब्दांच्या फुलांनी..तुम्हाला ती आवडतील याची खात्री आहे..खूप लहानपणी मी हे रोपट लावलं..माझ्या वयानुसार तेही मोठं झालंय ...बहर अजूनही येतोय..सडा अजून पडतोय..तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत....नक्की द्या..आणि माझी शब्द फुलं अशीच वेचत राहा..
Wednesday, 5 May 2010
आता
मी ब्लॉग लिहायला सुरवात केली तेव्हापासून डायरीत लिहायचा बंद केलं.आता पेन कागद कमी असतात जवळ...त्याची जागा लॅपटॉपने घेतलीये.फिरून,चक्कर मारून...लिहिण आता बंद झाल.आता लिहिते फक्त तेव्हाच जेव्हा मेल्स चेक करते किंवा लॅपटॉप जेव्हा सुरू असतो.नाहीतर .... सुचलेलही आता मी लिहित नाही.आता आई नसते ओरडायला बस झालं म्हणून...आणि मीही लाडात येत नाही.आता वाचन हि खूप कमी झालये आणि लिहीनही. आता पेन कोरडे झालेत आणि शाईहि तशीच आहे दौतीत.पानही तशीच आहेत.डाय्ररी रिक्त आहे.आता लिहायचं म्हणून ग्यॅलरीत बसत नाही.वेळ भेटला तरीही तो लिहायला नेहमीच वापरत नाही.कधीतरी लिहिते थोडाफार चुकल्यासारखं वाटतं म्हणून. आता..आता सारच बदललय मी आणि आयुष्यहि...आता मी जरा मोठी झालेय स्वीकारल आणि नाकारल तरीही...
Subscribe to:
Posts (Atom)