Wednesday 10 March 2010

शाप




               ते क्षण तेव्हाचे,
           झेलता मला आले नाही.
             दुःख माझेच होते,
         पण पेलता मला आले नाही.


        साऱ्या गोष्टीचा बाऊ होऊन,
       त्या मला हसून चिडवतात.
        माणूस असून सारे काही,
          करता तुला आले नाही.

     निसर्ग आणि देवही हसतो,
     माझ्या अश्या शांततेवर.
      सारे काही देऊनसुद्धा,
   आनंद लुटता तुला आला नाही.

     उसळतात मग लाटा जेव्हा,
    तरीही मी शांतच असते.
    चंद्र मिश्कील हसून बोलतो,
शाप माझा होता हेही सांगता तुला आले नाही.

चारोळी!

निसर्गाच्या नियमांना,
फार कमी  अपवाद असतात.
अन अपवाद म्हणून खरं तर ,
त्यांनाच फार नियम असतात.

Pages