Saturday, 23 April 2011

जीर्ण....

जीर्ण झाले जुने विचार...
जीर्ण त्या आठवणी...
कित्ती बदललेत आचार सगळे...
कित्येक केल्या पाठवणी

शाई सुकली...कलम गंजली..
पानही पिवळे पडले.
नव्या युगात इतकी ती रंगली...
पण  न कळले काय दवडले..?

गुलमोहोर सुकला आहे..
मोगरा मात्र फुलला आहे..
जुन्या त्याच त्या ...रस्त्यावरती...
नवा सडा हा पडला आहे.

वळणावरती वळून घ्यावे..
गळता पाने...गळून घ्यावे..
तुफानाला लढून उरावे..
स्वतः स्वतःचे पिलू बनावे..

उठून पळावे त्या जीर्णपणातून..
पळतच राहावे रस्त्यावरती..
उतरू दे नशा त्या रिक्तपणाचा..
कुणी नसेल जर..हाकेवरती.





Pages