निर्विघ्न करुमेदैव सर्वकार्यषु सर्वदा
या मंत्राने आपण गणपतीला प्रार्थना करतो...ती यासाठी कि आपण सुरु करीत असलेल्या कामाला कुठलीही अडचण न येत यश मिलो यासाठी.प्रत्येक शुभ कार्याची सुरवात गणपती मंत्राने होते.वर्षानुवर्षे पुजल्या जाणाऱ्या या बाप्पाच्या चतुर्थीला मंगलदायक मानले जाते.सुखाचा करता आणि दुखाचा हर्ता समजल्या जाणाऱ्या बाप्पाचे पोट सगळ्या जगाचे दुख झेलण्यामूळेच कि काय मोठे असावे.लहानपणी मला गणपती बसने म्हणजे आनंदी आनंद असायचा.त्याचं कारण म्हणजे आई मोदकात ५ पैसे टाकायची.आणि ते ज्याला भेटतील..त्याला बाप्पाचा प्रसाद मिळेल अशी सांगायची...तो मिळवण्याच्या धडपडीत मी जास्तीत जास्त मोदक घेत असे.अर्थातच जास्तीत जास्त वेळा मलाच ते मिळायचे.गेली काही वर्ष ते बंद झालंय आणि आता अश्यकच आहे.पण ते दिवस फार मजेशीर होते.गणपतीचे हे १० दिवस म्हणजे उत्साहाचा सोहळाच असतो हे नाकारून चालणार नाही.या मंगलदायक सोहळ्याची सुरवात करण्यास मोठा हातभार लावणाऱ्या लोकमान्य टिळकांस माझे शतश: प्रणाम!
गणपती बाप्पा मोरया!