Thursday 30 September 2010

असंच

अंधारात हात फिरवले कि ते कुणालाही लागत असतात.

म्हणून आपण तसं करत नाही.

अंधारची आस कुणाला असते?उजेडाचे स्वप्न पाहणारयास नक्कीच नसते.

अंधारत शोधूनही सापडत नसतात रस्ते अनोळख्याला.

किती आपण जपून ठेवतो आपल्या सगळ्या अनमोल क्षणांना.

स्वप्न सुद्धा कशी गिरगीटासारखी असतात.पूर्ण झाल्याचे उसासे सोडताच पलटून जातात.

आपल्या नकळ आपल्या सोबत अनेक दुवे असतात.

रस्यावर चालतांना अनके चेहरे दिसतात.

ध्येय असूनही नसल्यासारखे आपण कावरे बावरे होतो.

प्रत्येकाच्या आयुष्यात असा क्षण येतो.

कितीतरी स्वप्न मनात घर करून असतात.

काही पूर्ण होतात काही पुन्हा जाऊन बसतात.

आपण स्वप्ने पाहतो कारण त्यांना अर्थ असतो.

वाहत्या पाण्यालाही एक प्रवाह असतो.

आपण पाण्यासारखं वाहत राहायचं असतं अर्थपूर्ण.

आणि मनसोक्त जगायचं अंधाराकडे न जाता..

प्रत्येक क्षण...निखळ,निर्व्याजी,नशिला.

Thursday 23 September 2010

बघ जमवून आणखी थोडं

तक्रारीचा  सूर तुझा,
आणि माझा त्यावर चिडण्याचा.
कसा शिकशील डाव राजा,
गढूळपणा दूर करण्याचा?



आई म्हणते पक्षासारखं,
वागलं पाहिजे नेहमी.
पंखावरलं पाणी झटकून,
उडलं पाहिजे तुम्ही.


मला ते जमत नाही,
आता ते शिकते आहे.
शिकता शिकता हजारदा..
नकळतच चुकते आहे.


माझं घरच उन्हात,
आणि 'तो' राग माझ्या मनात.
आजवर कमवलेलं मग
जातं काही क्षणात.


नको वाटतातं स्वप्न सारे,
क्षणभर मग सजवलेले
दिसत असते तेव्हा तुलाच मग,
मी विचारात हरवलेले.


बघ जमवून आणखी थोडं,
कदाचित तुलाही जमेल.
सोडवू या हे क्लिष्ट कोडं,
म्हणजे रागही रडेलं. 

मग पहा स्वप्नांवर कसं,
राज्य करू दोघं. 
मान-अपमान आणि रागाचे,
परतवून लाऊन सोंगं.

Wednesday 22 September 2010

जशी संध्याकाळी,
मी गायले इतके.
भलतेच निघाले धागे,
मग स्वप्न पहिले इतके.


सवयीचे झाले आता,
एकटेपणाचे  हे छळणे.
अश्रू मुठीत झेलून,
हुंदक्यातच सतत हे जळणे.



मी शोधले किनारे जितके,
परतवले तुही मला तितके.
तो धन्य 'पतंग' आहे,
ज्याच्या जळण्याने मन हळहळते.


मी फेरीले पाणी,
त्या आसेवर ज्यास मी झुरते,
हाय तिची इच्छाशक्ती,
तितकीच दमदार मला ती स्फुरते.

पाऊलखुणा

वर्तमानकाळात चालून गेलो,
तरी भूतकाळात जातांना.
आठवतील काही पाऊलखुणा तुला,
आपण मनसोक्त रमतांना.


वेळ कापरासारखी भुर्रकन उडून जाते,
उगाच प्रयास करतो आपण
तिला थांबवतांना.
तरीही स्मरशील तुही कदाचित 
हि एक गोड आठवण 
मी असतांना ...नसतांना.


मी जपणार आहे हेही शिंपण,
म्हणजे सापडेल पुन्हा डोकावतांना.
असे कितीतरी क्षण घालवलेत आपण ,
आत्तापर्यंतचा प्रवास करतांना.

Friday 10 September 2010

सुखकर्ता दुखहर्ता

                                       वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ
                                        निर्विघ्न करुमेदैव सर्वकार्यषु सर्वदा
 या मंत्राने आपण गणपतीला प्रार्थना करतो...ती यासाठी कि आपण सुरु करीत असलेल्या कामाला कुठलीही अडचण न येत यश मिलो यासाठी.प्रत्येक शुभ कार्याची सुरवात गणपती मंत्राने होते.वर्षानुवर्षे पुजल्या जाणाऱ्या या बाप्पाच्या चतुर्थीला मंगलदायक मानले जाते.सुखाचा करता आणि दुखाचा हर्ता समजल्या जाणाऱ्या बाप्पाचे पोट सगळ्या जगाचे दुख झेलण्यामूळेच  कि काय मोठे असावे.लहानपणी मला गणपती बसने म्हणजे आनंदी आनंद असायचा.त्याचं कारण म्हणजे आई मोदकात ५ पैसे टाकायची.आणि ते ज्याला भेटतील..त्याला बाप्पाचा प्रसाद मिळेल अशी सांगायची...तो मिळवण्याच्या धडपडीत मी जास्तीत जास्त मोदक घेत असे.अर्थातच जास्तीत जास्त वेळा मलाच ते मिळायचे.गेली काही वर्ष ते बंद झालंय आणि आता अश्यकच   आहे.पण ते दिवस फार मजेशीर होते.गणपतीचे हे १० दिवस म्हणजे उत्साहाचा सोहळाच असतो हे नाकारून चालणार नाही.या मंगलदायक सोहळ्याची सुरवात करण्यास मोठा हातभार लावणाऱ्या लोकमान्य  टिळकांस माझे शतश: प्रणाम!
गणपती बाप्पा मोरया!  

Thursday 9 September 2010

स्वैर

मी जितका जीवनाला जाणायचा प्रयत्न  केला ...तितकंच ते मला गूढ वाटत गेलं.
मनुष्याला गूढ गोष्टीत निसर्गताच ओढ असावी असे वाटते.खरच हे जीवन नावच कोडं म्हणजे...कुठलीतरी न संपणारी ओंळ आणि आपण त्याला पूर्णविराम देण्यासारखच  झालं कि.विचार असे  स्वैर असतात हे मला मी लिहायला लागल्यावर जाणवायला लागलं.मोठमोठ्या महापुरुषांनी आणि संतानी त्याला अतिशय सोप्या पद्धतीने व्यक्त करायचा  प्रयत्न केलाय. पण म्हणून कोणी त्यावर विचार करणं थांबवत का? नाही मला नाही वाटत असं मी ह्या कोड्याला उलगडण्याचे सगळे प्रयत्न करत असते.निसर्गाच्या कुठल्या कुठल्या गोष्टीवरून अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असते.पण काही काळानंतर जाणवते कि हे विचार विकारात बदलत चाललेत ..मग मी पूर्णपणे थांबवते.अर्थात काही काळापर्यंतच..तुम्ही काय करतात?

चारोळी

तो अभिमान फुकाचा असतो

अन स्वाभिमानही फुकाचा असतो.

नात्यात ज्या परस्परांच्या .....

अविश्वास सदैव वसतो.


Sunday 5 September 2010

झाल्या हजार जखमा अन शोषिले इतके..

झाल्या हजार जखमा अन शोषिले इतके,
तरीही नाद सुटे ना त्या बेकार अपेक्ष्यांचा.

जाळून राख झाली  कधीच अस्तित्वाची,
तरीही अर्थ लागेना या गूढ जीवनाचा.

मी मलाच केली शिक्षा कित्येकदा,
तरीही सुटता सुटे ना हा गुंता परस्परांचा.

सवाल कसले?मी पाठपुरावाच केला,
तसा आदेशच होता  मला, माझ्याच भावनांचा.

चालली नाव कोठे ?..वल्हे कधीच पडले,
नुरले न गाव माझे अन मागमोस किनाऱ्याचा.

Pages