माझ्या अंगणात स्वागत आहे तुमचं....माझ्याच शब्दांच्या फुलांनी..तुम्हाला ती आवडतील याची खात्री आहे..खूप लहानपणी मी हे रोपट लावलं..माझ्या वयानुसार तेही मोठं झालंय ...बहर अजूनही येतोय..सडा अजून पडतोय..तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत....नक्की द्या..आणि माझी शब्द फुलं अशीच वेचत राहा..
अशी एका व्यक्तीची कमी.. दुसऱ्या व्यक्तीशी बोलून थोडीच भरते. व्याकुळता कमी होत नाही.. तडफड कमी होत नाही. जीवात जीव नाही..आणि डोळ्याला डोळा नाही. प्राणापलीकडे जाऊन जीव लावणं.. म्हणजे शाप असतो..मन सज्जना!