Sunday 12 February 2012


आपण गातो तीच रात 
आपली राहत नाही
आपण झटतो तीच साथ 
आपली राहत नाही

क्षणाला कोसतो ती 
नाती आपली राहत नाही
दोन घडीच्या डावात..
आपला जीव आपला राहत नाही

तुटणाऱ्या ताऱ्याकडच्या
मागणीलाही अर्थ उरत नाही 
आणि चंद्रात  पाहणारी
प्रतिमाही आपली उरत नाही.

कण अन कण मानतो ज्यात
तोच कणही आपला उरत नाही
श्वास उधार ठेवतो ज्यासाठी
तोही आपला राहत नाही

अपार जीव लावतो ज्यांना 
तेच आपले उरत नाही
अश्यावेळी नात्यांना मग 
काहीच अर्थ उरत नाही

आपल्याला हक्क वाटणारी
 नाती जेव्हा उरत नाही
डोळ्यातील अश्रू पुसायला
रुमाल तेव्हा पुरत नाही

भरभरून दिली साथ ज्यांना
तेच जेव्हा झुगारतात
तेव्हा मग पाहायला आराश्यातही
अस्तित्व आपले उरत नाही


आता अर्जुनाप्रमाणे मला 
फक्त एक डोळा दिसतो ध्येयाचा 

आणि रस्ताही आहे माझा 
दूर दूर हा काट्यांचा

मनात माजलाय काहूर
 भरकटलेल्या वाटांचा 

आशीर्वाद आहे पाठीवर जरी 
थरथरणाऱ्या  हातांचा 

पण प्रचंड आत्मविश्वासाने 
यश डोंगर आहे गाठायचा 

तेव्हा कुठे जिभेला 
लावली मी धार होती
न तलवार लढायला
न मशाल होती.


तेव्हा कुठे जिभेला 
लावली मी धार होती
न तलवार लढायला
न मशाल होती.

आता....


मी वळतेच आहे इथून
तुही वळ आता 
सोबत चालले काही पावले 
तेच जगायला बळ आता

मी वळवलेच आहे मन 
तुही तुझे वळव आता 
जपुयात हृदयात हळुवार 
हे बंध आता 

मी जपतेच आहे मला
तुही तुला जप आता 
करू नये कुणीही मनात
कसलीही खंत आता 

मी टाळतेच आहे हृदयचे पाश 
तुही सारे टाळ आता
एकवटुनी सारी शक्ती
मिळवू या ध्येय आता.
.

आता नाहीच पाहणार वळून 
फक्त तुझा हात दे

कोरड्या शब्दांचे फवारे नाही
आपुलाकीपूर्ण साथ दे

ध्येय म्हणजे जाणतेच मी
फक्त धावण्याला वेग दे

सज्ज आहे उडण्याला 
पंखात मात्र बळ दे 

वरवर नात्याचा देखावा नको
जगण्याला अर्थ दे



Pages