मी वळतेच आहे इथून
तुही वळ आता
सोबत चालले काही पावले
तेच जगायला बळ आता
मी वळवलेच आहे मन
तुही तुझे वळव आता
जपुयात हृदयात हळुवार
हे बंध आता
मी जपतेच आहे मला
तुही तुला जप आता
करू नये कुणीही मनात
कसलीही खंत आता
मी टाळतेच आहे हृदयचे पाश
तुही सारे टाळ आता
एकवटुनी सारी शक्ती
मिळवू या ध्येय आता.
.
No comments:
Post a Comment