Sunday, 12 February 2012


आपण गातो तीच रात 
आपली राहत नाही
आपण झटतो तीच साथ 
आपली राहत नाही

क्षणाला कोसतो ती 
नाती आपली राहत नाही
दोन घडीच्या डावात..
आपला जीव आपला राहत नाही

तुटणाऱ्या ताऱ्याकडच्या
मागणीलाही अर्थ उरत नाही 
आणि चंद्रात  पाहणारी
प्रतिमाही आपली उरत नाही.

कण अन कण मानतो ज्यात
तोच कणही आपला उरत नाही
श्वास उधार ठेवतो ज्यासाठी
तोही आपला राहत नाही

अपार जीव लावतो ज्यांना 
तेच आपले उरत नाही
अश्यावेळी नात्यांना मग 
काहीच अर्थ उरत नाही

आपल्याला हक्क वाटणारी
 नाती जेव्हा उरत नाही
डोळ्यातील अश्रू पुसायला
रुमाल तेव्हा पुरत नाही

भरभरून दिली साथ ज्यांना
तेच जेव्हा झुगारतात
तेव्हा मग पाहायला आराश्यातही
अस्तित्व आपले उरत नाही

2 comments:

Pages