आता फक्त नहात राहावं,
आल्या सरीत चिंब.
आता फक्त गात राहावं,
होईल तितका दंग.
लागणार नाही आरसा आता,
पाहण्या प्रतिबिंब.
डोळ्यासमोर अक्खी चित्रफित,
आणि समाधिस्थ अंग...
आता दूर दूर..किनारा आणि,
त्यात हलकेच उठणारे तरंग.
रोखून धरावे श्वास आणि,
उधळून द्यावे द्वंद.
आता पहाट बोलत नाही,
पसरत नाही "तो" सुगंध.
अक्खा प्रहर सरतो असाच,
आणि मग पसरतात निशेचे रंग.
आता अनुभवांचे वय झाले,
जपून असते काही ऋणानुबंध.
आणि मग मधूनच अल्लड होऊन..
झेलून घेते हवेसे हवेसे रंग.