Vedana suddha samjutdarapudhe
Kahi kalach namte.
ani na samjnaryachya manat
badhir houn vahte.
माझ्या अंगणात स्वागत आहे तुमचं....माझ्याच शब्दांच्या फुलांनी..तुम्हाला ती आवडतील याची खात्री आहे..खूप लहानपणी मी हे रोपट लावलं..माझ्या वयानुसार तेही मोठं झालंय ...बहर अजूनही येतोय..सडा अजून पडतोय..तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत....नक्की द्या..आणि माझी शब्द फुलं अशीच वेचत राहा..
Monday, 25 July 2011
Friday, 24 June 2011
डोळ्यात मावेनासं झालेलं ऊन,
आणि आपल्याच व्यक्तीचं जाणवणारं सततच ऋण.
सारखा टोचतं...तीक्ष्ण काट्यासारखं..बोचतच राहतं.
नको असेल तरी ते मावळत नाही...आपल्याला हवं तेव्हा....
जाणीवा मात्र सदैव...अंधारल्यासारख्या होतात तेव्हा..लक्ख उन्हातही.
चालण मात्र चुकत नाही तेव्हा.....फक्त या आशेवर चालावं...कि ते ढळेल लवकरच...
त्याचा ढळंण्याचा काळ काही...ठरलेला नसतो..
पण त्यालाही कधीतरी..वळण्याचा मोहं होत असतो.
Tuesday, 21 June 2011
त्याग
दुसऱ्यासाठी त्याग केला कि,
तो त्याची नेमकी.. कदर करत नाही.
आणि आपल्याला त्रास दिल्याशिवाय,
सुखाला चैन पडत नाही.
Thursday, 16 June 2011
ढगं
माझ्या डोळ्यातील पाऊस
तुला खूप-खूप आवडतो...जेव्हा..
बरसणारा ढग मात्र..
हमसून-हमसून..वेडा होतो तेव्हा
आयुष्यभर..वाऱ्यासारखी..
जिथे तिथे...प्रेम शोधात बसलेली ती.
बेभान...थकलेली..रिकाम्या हातानी..
गर्दीच्या जगात फिरतेच आहे.
समुद्राच्या पाण्याशी खेळतांना लाटांनाही,
साकडे घालणाऱ्या..तीच..सावळ रूप..बेचैन होऊन,
अस्वस्थतेनं किनाऱ्यावर फिरतांना,
ओसाड मनाच्या कप्प्याला कुरवाळतांना,
दूरवर...वाटेला आशेने नजर लावून बसलेली..ती...
छोटीशीच बाहुली..आपल्याला हव्या असलेल्या..त्या प्रेमाच्या शोधात...
अधिरतेत...एकटीच...तारुण्यातही...या आशेने..
कि कधीतरी कदाचित कुणीतरी समजून घेईल..
मनस्तापाचे..झरे तेव्हा वाहणार नाही..
तोपर्यंत असच आपलं..एकटपण..नकोसं...
त्रासदायक...अर्थहीन..वाटणारं..
Monday, 13 June 2011
शहाणपणा ...
बाजारी त्याच ...
मी शहाणपणा विकला होता.
मी शहाणपणा विकला होता.
जेथे गेली कित्येक वर्ष..
मी क्षणाक्षणाला तो जपला होता.
Wednesday, 1 June 2011
Thursday, 26 May 2011
ब्लॉग लिहायला सुरवात केली तेव्हापासून डायरी लिहिणं बंद झालं.आता स्वतःचं काहीही वाचायच झालं तर..आधी ऑनलाईन यावं लागतं.आता कागदांवर लिहिणं सुटलय..अस्ताव्यस्त पडलेली कागद आता कधीच नसतात माझ्याकडे.कंटाळा आला म्ह्णून सुचलं तरी लिहायचं सोडलाय ...काहीश्या ओळी मात्र लिहून होतात..तसेच काही विचारहि....लिहिणं सुद्धा रटाळ वाटतं कित्येकदा.. भावना शब्दात मांडल्या कि..मनातले विचार...त्यात जाऊन बसतात...भावनांचे तात्पुरता स्थलांतर होते ते असे...
Subscribe to:
Posts (Atom)