Sunday, 21 August 2011

जिथे मार्ग नसतो,
नेमकी तिथेच आपल्याला आशा वाटते..
वेडया झालेल्या मनाला फक्त,
खोटया समजुतीची दिशा लागते..

Saturday, 13 August 2011

तुटण्यासाठी लागत नाही..
काही क्षणही नात्याला..
अख्खी आयुष्य उणी पडतात..
मात्र..तीच अलगद जोडायला.

Monday, 8 August 2011

आजसुद्धा माझी पहाट..
रोजप्रमाणेच सुनी होती.
सोबत अंधारलेलं एकटेपण अन.
तुझ्या हव्यासाची आहुती होती.

Wednesday, 3 August 2011

चौकट!

चौकटीत राहू जगणं म्हणजे..
अर्थहीन जीवन,अस्तित्वाचा खेळ.
चौकट तोडून जगणं..म्हणजे..
नियम तोडल्याची भीती,लढाई...
चौकटच ठरवते माणसाचं आयुष्य,
आणि बिघडवतेही  तीच.
चौकट बनते कधी स्वार्थी वृत्ती 
तर कधी नियम ..
माणूस मात्र गोंधळळेला ..
चौकटीतही..आणि चौकटी बाहेरही.

Monday, 25 July 2011

Vedana suddha samjutdarapudhe
Kahi kalach namte.
ani na samjnaryachya manat
badhir houn vahte.

Friday, 24 June 2011

डोळ्यात मावेनासं झालेलं ऊन,
आणि आपल्याच व्यक्तीचं जाणवणारं सततच ऋण.
सारखा टोचतं...तीक्ष्ण काट्यासारखं..बोचतच राहतं.
नको असेल तरी ते मावळत नाही...आपल्याला हवं तेव्हा....
जाणीवा मात्र सदैव...अंधारल्यासारख्या  होतात तेव्हा..लक्ख उन्हातही.
चालण मात्र चुकत नाही तेव्हा.....फक्त या आशेवर चालावं...कि ते ढळेल लवकरच...
त्याचा ढळंण्याचा  काळ काही...ठरलेला नसतो..
पण त्यालाही कधीतरी..वळण्याचा मोहं होत असतो.



Tuesday, 21 June 2011

त्याग

दुसऱ्यासाठी त्याग केला कि,
तो त्याची नेमकी.. कदर करत नाही.
आणि आपल्याला त्रास दिल्याशिवाय,
सुखाला चैन पडत नाही.

Pages