Sunday, 20 December 2009

दारं

प्रत्येक घराला दारं असतात.
तशी प्रत्येक मनालाही असतातच.
पण प्रत्येक घराची दारं
उघडी नसतात सताड
सगळ्यांसाठी किवा कुणासाठी तरी .
तसंच मनाची दारही नसतात उघडी
सगळ्यांसाठी किवा कुणासाठी तरी .
दोघांत बरचं साम्य आहे आणी भेदही
कुणाला आत घ्यायचं नसेल
तर घराची दारं लावता येतात
पण मनाच्या दाराचं तसं नाही
ती लावता येत नाही प्रयत्नपुर्वकही.
मनाची सारी दारं उघडी असतात खरं तर.
पण सोंग असतं ते लावलेल्याच.
घराच्या दारांना जखमा नसतात कुठेही.
फक्त पडतात तडे आणी ते चिन्ह असतं..
दारं जुनी झाल्याचं नाहीतर लाकूड खराब असल्याचं.
पण मनाच्या दारांना जखमा असतात खूप...
त्या दिसत नसतात कुणालाही.
ज्याची त्यालाच माहिती असतात..
प्रत्येक दाराच्या कहाण्या आणी इतिहास वेगळे असतात.तसे मनाचेहि.मनाचे अस्तित्व संपते मृत्यू झाल्यावर.पण दाराचे अस्तित्व मिटत नाही,निर्जीव असल्याने ते टिकते.
इतके असले तरी दारं असते छोटेच अन मन असते मोठे.कारण दाराला नसतात स्वप्नं,धेय्य आणी संकटाचे आयुश्य.
मनाला सारे असते.
मन जिंकून आणते सारे,
कितीही खचले तरीही.त्याच्या कार्यशक्ती आणि जिद्दीने.
आणि मग शेवटी विजय होतो मनाच्या दारांचा,
जो असतो ठरलेला.
कारण घराच्या दाराचे शरीर जळल्यावर..
उरते फक्त राख.
पण मन कितीही खचल...तरीही उरते त्याचे अस्तित्व शेवटपर्यंत.

4 comments:

  1. Hey hi... Khup chhan lihila aahes!!!

    ReplyDelete
  2. Its really nice dear.i lov this...go ahead
    BEST LUCK 4 NEXT POEM

    ReplyDelete
  3. khup chhan ahe kavita..
    keep writing!!

    ReplyDelete
  4. Kharach khup sundar lihites tu,
    asach lihi, khup lihi, best luck..

    ReplyDelete

Pages