Friday, 23 April 2010

हितगुज आठवणीचे....

आठवण!आठवण!
कसलीही,कुणाचीहि,कश्याचीही!
छळत असते खूप!
हि चार अक्षरं छोटी पडतात त्याचा विचार करतांना!
मनात प्रश्नांचा काहूर होतो,शरीराचा तापमान वाढत,
नेहमी दुर्लक्षित असलेल्या शरीराचा श्वासही घाबरतो.
आणि हृदयाची धडधड वाढते,नाहीतर शिथिल तरी होते.
             लहानपणी जिथे खेळलो,बागडलो तिथल्या त्या जागेची,व्यक्तींची,वस्तूंची आठवण मनात आली कि अचानकच मन हळवं होत.निरागसपणा,खट्याळपणा आठवून आपणच आपल्याला हसत असतो.लपंडाव,पळापळी,चीपिचीपी,दगड कि माती,कॅरम,कोकोनट,बुद्धिबळ,असो कि मामाचं पत्र असो अन गोल गोल राणी इत इत पाणी,कच्चा लिंबू पक्का लिंबू असो.सारेच खेळ खेळलेलो आपण जीवनाच्या  खेळात हरणार कि जिंकणार कि तो अर्धवटच सोडणार हे ज्याच्या त्याच्या कर्तुत्वावर किंवा नाशिबावारही ठरतं
नशीब नावाची गोष्ट मला कुणास ठाऊक रुचत नाही.परंतु कित्येकदा विचारांची गाडी  नशिबाच्या स्टेशनावर थांबते,खरं तर मी माझ्या मनगटावर विश्वास ठेवते.हाताच्या रेष्या आणि ज्योतीषीवर नाही.कारण ते आपल्या गोंधळलेल्या प्रश्नांचा  मार्ग दाखवतात.परंतु पूर्ण साथ देत नाहीत.स्वत:च  कर्तुत्व,हातांवर पर्यायाने हाताच्या मनगटावर अवलंबून आहे.यावर माझा पूर्ण विश्वास असल्याने मी उजव्या हाताच्या मनगटाला म्हणजे
क्रियाशीलतेच प्रतिनिधित्व  करणाऱ्या हाताला सतत जागृत राहण्यासाठी आणि क्रियाशीलतेसाठीही
 काळा दोरा बांधलाही  आहे.आणि बरचं काही... असो जसं जसं आपण मोठे होतो,तसं तसं आपण  नवीन व्यक्तींना भेटता असतो.कितीही नाही म्हटलं तरी आपल्याला भेटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्या अंतर्मनात असतेच.अश्या आणि अनेक व्यक्तीच्या अनुभवांवरून आपण जीवन शिकत असतो.
आपण तरुणाईच्या जल्लोषात आव्हान स्वीकारीत पुढे जात असतो.पडतो,लढतो,जिंकतो,हरतो.तरीही स्वप्नांच्या अन ईछयांच्या पुर्तीसाठी झटत असतो.त्यावेळी-
 कित्येकदा आपल्याला,
आपलाच आभाळ ढगाळलेला वाटतं.
कित्येकदा आपलंच मन,
आपल्याला सुनंसुनं वाटतं.

गुरुवर्य दाखवत असतात ती वाट
तरीही आपल्याला चुकल्यासारखा वाटत.
ध्येयाकडे चालातानाही,
अचानकच भरकटल्यासारख वाटतं.

हव्याहव्याश्या वाटणाऱ्या गोष्टी,
मिळता मिळता निसटून जातात  मुठीतून तेव्हा,
आकांक्षी मनाला खूप खूप,
खचल्यासारख वाटतं.

गैरसमजांचे  रंग जेव्हा,
उडवत असतात आपलेच आपल्यावर ,
तेव्हा मग भावनिक मनाला,
एकट एकट वाटतं.
कित्येकदा.... 
         अश्यावेळी ध्येयाने प्रेरित मनाने,भावनांवर नियंत्रण करून अडथळ्यांचा,खाचखळग्यांचा योग्य अर्थ घेऊन जीवनाच्या सर्वोच्च्य शिखरावर पोहचणे हाच मला मानवी जीवनाचा किंबहुना मानवाचा सर्वश्रेठ गुण वाटतो.   प्रत्येकाला हवं ते हवं तेव्हा मिळू शकत नसत किंवा त्याला योग्य वेळी ओळखण होत नसतं.आयुष्यात प्रत्येकाला हजार संधी येतात.पण संधीच सोनं करण फक्त काहींच जमत.कारण आठवणीच्या सहाय्याने अनुभवांचा ताळमेळ घालून आलेल्या संधीशी स्वत :ला जूळवनहि  फक्त काहींच जमत.आणि त्याचं आयुष्य  सोनेरी होत.अश्या सर्वोच्य स्थान पटकावलेल्या किंवा ध्येय गाठलेल्या किंवा त्याच्या आसपास असलेल्या व्यक्तींनी आठवणी मनसागरच्या  शिंपल्यात कोंडून ठेवलेल्या असतात.आणि त्याच्या कठोर परिश्रमाचे फळ ते सुंदर मोतीत करतात. उतारवयाकडे झुकणाऱ्या मानवी मनाना  तर त्यांच्या आठवणी सुखदच असतात.त्यांच्या बोलण्याने,वागण्याने,त्यांच्या अनुभवाने जणू ते सांगत असतात.कि -
लहर जेव्हा येते  आठवणीची,
सुटतात गाठी तेव्हा भूतकाळाच्या.
 क्षणात रमतो बालपणात,
 अन क्षणात यौवनात.
आठवणीच्या कावडश्याने,
फिरून येतो म्हातारपणात.
           तर ह्या आठवणी साध्या नसतात.त्या ज्याच्या त्याच्या भिन्न-भिन्न असतात.जीवनाच्या शेवटापर्यंत टिकणाऱ्या श्वासासारख्याच इतर गोष्टीसारख्याच अमीट असतात.हृदयावर,खोल,कोरीव,सुंदर असतात त्या.अर्थात ज्याच्या त्याच्या दृष्टीकोणावरहि अवलंबून असत.आठवणी या अनंत असतात.सदैव,अविरत चालणाऱ्या श्वासासारख्या मनातल्या कप्प्यात.जश्या-
आठवणीच्या गगनाला,
गडे किनारे फार,
कोठे कोठे थांबावे ?
असे प्रश्न हजार.
         खरं तर आठवण हि एक गोड साठवण असते.आठवण चांगली असो कि वाईट असो.प्रत्येकाच्या मनात ती असतेच.तिचा प्रवास जितका लांब तितकाच तिचा विषयही मोठा.'आठवण 'या चार अक्षरांबाबत खूप काही बोलता येण्यासारखा आहे.त्याबाबत खोल,गूढ,विसःल,मधुर,अविस्मरणीय अश्या कितीतरी शब्दांच्या सहाय्याने साठवता येण्यासारखंहि आहे.परंतु आठवणींना अनुभवाची जोड देऊन पर्यायी उत्तर चांगला यावं म्हणूनच मला वाटते-
रम मानवा तू आठवणीतही,
पण वर्तमानातही जगात रहा.
होळी कर तू वाईटाची,
अन चांगलं तेच स्वीकारत राहा.

मधुर आठवणींच्या साथीनं,
दु:खाला फुंकत राहा.
अनुभव आणि जिद्दीने,
स्वप्न तुझे साकारत रहा.

उत्कर्ष्याच्या शिखरावर पोहच,
आणि मानवतेने वागत जा.
आठवणींच्या कल्पतरूला.
हळुवार गडे जपत राहा.

2 comments:

  1. Khup chhan lihilay.. vachatana baryach athwani jagya zalya.. thnks for posting this..

    ReplyDelete

Pages