कविता सुचण हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.ती सुखद आणि अर्थपूर्ण वाटणं हे जितका महत्वाचं तितकच ते मांडणही अवघड असते.मला ही दैवी देणगी वाटते.कविता अशीच कुणालाही सुचत नाही.लहानपणी शाळेच्या पुस्तकातल्या कविता समजायला लागल्या तेव्हा कळेना ते इतका सोपं असतं आणि हे भाग्य मलाही लाभेल असं.मोहक ओळी आणि अर्थपूर्ण शब्दांनी मला कवितेच आकर्षण वाटायला लागलं.आणि मग मी कवितेच्या प्रेमात पडले समजलेच नाही.आणि मग अश्या ऋतूतच मला पहिली कविता सुचली,जमली,आणि मला परितोषीकही जाहीर झाले.त्यासाठी जाहीर झालेले १०१ रुपये आणि ढाल आमच्या कंजूस शाळेने कधीच दिले नाही.हे एक वेगळंच प्रकरण...पण मला तो सुखद धक्का होता.त्यावेळी मी ८ व्या इयत्तेत होते.त्यांनतर शाळेत मला फारच भाव आला होता.माझी पहिली कविता ही अतिशय विनोदी होती आणि ती 'उंदीरमामा'वर होती.आता ती मला नीटशी आठवत नाही.त्याचा कारणही सांगतेच तुम्हला.पण ती आज जितकी आठवते तितकी अशी होती...
उंदीरमामा
उंदीरमामा
एक होता उंदीरमामा,
नाव त्याचे रोम्या,रोम्या.
एकदा वाजली त्याला थंडी,
अंगात घातली छोटीशी बंडी.
तेव्हाच तो डॉक्टरांकडे गेला,
नाव त्याचे डॉक्टर मनी.
डोके ठेवून छातीवर,
ठोके मोजते मनी फार.
........................
.........................
...................
...................
बाहेर येऊन म्हणते कशी,
डॉक्टर गेलेत फिरायला.
आता यातली बरीच कडवी मला आठवत नाही.त्यानंतर मी बरच लिहायला लागले.पण त्यामुळे माझे अभ्यासाकडे दुर्लक्ष्य झाले.त्यामुळे आई मला एकदा चांगलीच रागवली.आणि तिने अभ्यासाकडे पूर्ण लक्ष्य देण्याची सक्त ताकीद दिली.आणि कविता लिहिण बंद करायला लावलं.आणि एके दिवशी संतापात मी कचऱ्यासोबत कवितेची वही जाळून टाकली.ती या निर्धारणे कि आता पुन्हा मी कधीही लिहिणार नाही.पण ते मला जमला नाही.आणि अडीच वर्ष्यानी मी पुन्हा लिहिणं सुरु केलं. मात्र आता मी नुसते कविता लिहित बसायचे नाही.सुचलेलं.. जमेल तेव्हा जमेल तितका लिहून ठेव्याला लागले.त्यांनतर मला त्यामुळे सूत्रसंचालन करतांनाही सटासट हवं तेव्हा हवा ते टाकता यायला लागलं.यामुळे मला आयतीच संधी मिळू लागली आणि कौतुकासाहित.हा इतिहास नुसता कवितेचा नाही..तर लेख आणि कथा यांचाही आहे.मी त्यातही यशस्वी झाले.त्यावेळी मी वाचन खूप वाढवलं होतं.एक इथे नमूद करेन कि उत्तम वाचन हे तुमच्या उत्तम लेखनाचं कारण असू शकत अथवा असतच.आणि तुमच्या उत्तम प्रकृतीच आणि विचारांचही.अति अलंकारिक रचना करण मला स्वतःलाकधी आवडल नाही.लिहिणं ही एक गंमत वाटते.आणि अभिमानास्पदही वाटते.कधी कधी बरच काळ सुचत नाही...आणि प्रत्येक वेळेला चांगलं सुचेलंच असं नाही.पण जमेल तेव्हा मला मी शब्दातून व्यक्त करते.आणि मग ते मला हवं तसं अचूक जमलं म्हणजे मी आनंदाने भरारी घेते.शब्दांसहित,कवितेसाहित ..अर्थासहित..
मनातल्या हजार बाता,
मांडत असते शब्दात जेव्हा,
गगनी घेते उंच भरारी
एक-एक रचना उमलते तेव्हा.
लिहिण्याचा आस्वाद वेगळा,
अन एक-एक शब्दाचा स्वाद वेगळा.
मी जे लिहिते त्यातही रंगते ..
अन जे वाचते त्यातही.
होऊन तेव्हा रंगपरी मी,
खेळत बसते रंगसोहळा.
आईने मला नंतर कौतुकाची थापही दिली.आणि न थकता माझा कौतुकही ऐकून घेतलं..परंतु माझं कौशल्य तिला पारखून घ्यायचा होतं असं जेव्हा तिने सांगितलं...तेव्हा माझ्या कविता उमलण्याच्या सोहळ्याला खरा बहर आला....तो आजही चालू आहे अविरत...
"उत्तम वाचन हे उत्तम लेखनाचं कारण" - सहमत आहे
ReplyDeleteअशाच कविता उमलत राहोत .
बाकी पोस्ट छान झालीये
chaan...keep it up... god bless u dear
ReplyDelete