Tuesday, 28 December 2010

आजकाल काही लिहावेसे वाटत नाही...कंटाळवाणे वाटते सगळे...इथले वातावरण कधी चांगले असते तर कधी नुसताच पाऊस..पण निळेशार आकाश बघायला खूप आवडते.आणि घराजवळच्या हिरव्यागार गवतावर तासंतास बसून रहावेसे वाटते...जमत नाही जायला ते वेगळेच...पण खरच तिथले वातावरण फार आल्हाददायक आहे..भारावून जावे कुठल्या पुस्तकाने असे इथे मला मिळत नाहीये...किवा नुसतच चालत राहावं सकाळच्या गार वाऱ्यात....तेही जमेना.असा काहीही न करण्याचा माझा बाणा नव्हता खरं तर...पण माहित नाही का काहीही जमत नाहीये...नाहीतर आयुष्यावर भरभरून प्रेम करणारी मी सतत काहीतरी असा वेगळं करत होते आधी...कुणीतरी म्हट्लये...आयुष्यात असा बऱ्याचदा होतं...काहीही उमगत नाही..थोडा काळ...धुकं असतं, थोडा काळ स्वच्छ आभाळ....मना मध्ये माझ्या मात्र स्वच्छ सकाळ...

1 comment:

  1. पण बघ ह्या धुकातूनच आपल्यला वाट काढावी लागते.... धुकं असले म्हणजे थांबायच नसत नाही तर लोक आपल्याला येऊन धडकतीलना.... तुझ्या मनातली सकाळ तशीच स्वच ठेव.... माझ्या शुबेच्छा.... :)

    ReplyDelete

Pages