Monday, 31 January 2011


आता तुझ्या माझ्या वादाचा..
विषयहि वादातीत झाला आहे.
अन नकोनकोसा वाटणारा कधीच... तो ...
परकेपणा नात्यात आला आहे.
मनातले खोल चढ- उतार
कळे कुणाला ?
कळे ज्याला ..तोच अमृताचा प्याला...
छळे जीवाला....

Sunday, 30 January 2011

नाटकी तुझे प्रेम ते
क्षणभराचे थेंब ते.
त्रासदायक उन ते.
अन नको असलेले ढग ते...

Saturday, 29 January 2011


खोल दरीत का शोधते किनारे.. उगीच ....
 हे मला समजूनही  उमगेना...
धूर्त,बावडी आशा नेहमी..
 मला चकवून या वेताळाचा  नाद सोडेना..

Monday, 24 January 2011

कायदेभंग केल्यासारखी तू..
मला मूडभंगाची शिक्षा देतोस.
आणि दिवसभर शांत राहून..
मला अंदमानच्या कारावासात लोटतोस.

Thursday, 20 January 2011

आता तुम्ही मला
छळायचाच ठरवलं आहे..
मीही मग बळबळ
रडायचं ठरवलं आहे.
कविता काय मला रंगवता येतेच हो
तुम्ही म्हणताय म्हणून लिहायचा ठरवलंय

वेगळ वाटतंय..

आज जरा वेगळं वेगळं वाटतंय,
मन पुन्हा पुन्हा सैरभैर होतंय,
हळवं होऊन ...शांत राहून..
तंद्री लावतय विनाकारण.

कसलेही प्रश्न नाहीत...
म्हटले तर..
कसलाही त्रागा नाही....
पहिले तर...तरीही...
आज जरा वेगळं वाटतंय..

स्वप्न डोळ्यासमोर आहेत..
आणि ध्येय सुद्धा मांडलेली.
आत्मविश्वासाची कमतरता नाही...
आणि पाऊल पुढे टाकण्याचे भयही नाही.
तरीसुद्धा सैरभैर मन..

एक दिवस असा वेगळा...
नुसतच....मुक्त झुलण्याचा....
तल्लीन होऊन कामातच...
कामात गुंतल्याच्या देखाव्याचा...
फुलपाखरासारखं नुसतचं..गिरक्या घेतंय,
आज जरा वेगळच वाटतंय..

आईची आठवण येतीये...
वडिलाची सुद्धा येतीये...
मैत्रिणीची दंग घालायला...
घरचीही येतीये..आणि नाही पण....
कळत नाही नक्की काय पण
काहीतरी वेगळ वाटतंय.



Tuesday, 11 January 2011

सिडनी


वातावरणातील उल्हास..मोहक,मादक असतो हे मला ह्या रम्य शहरात आल्यावर अधिकच जाणवू लागलं.जाता-येता ओपेराहाउसचं मोहक दृश्य,ब्रिज,पाणी,कधी ऊन,कधी पाऊस,सुंदर अगणित समुद्र,डोळ्याचं पारणं फेडणारं नैसर्गिक सौंदर्य..हिरवेगार बगीचे मनाला खूप तजेलदार करतात.इथल्या वातावरणात नेहमी एख्याद्या मोठ्या सणाचं स्वरूप असतं.नेहमी काहीतरी कार्यक्रम असतात.स्वतःला गुंतवून घेणं यांच्या रक्तातच आहे.आणि तेही मनोरंजन करत.मला हे जिवंत माणसाचं लक्षण वाटतं.अनोळखी व्यक्तीलाही आदरपूर्वक स्मितहास्य करून त्याची विचारपूस करण्याचं कौशल्य तर अचंबित करणारं आहे.माझे शब्दही कमी आहेत याचा सौन्दर्य व्यक्त करायला.ते फक्त डोळ्यांनी आस्वादण्याचं आणि त्यात साठवून ठेवण्याचं आहे....

Friday, 7 January 2011

हरणं त्याला जमतं..
जो आधीच हरलेला असतो.
नाहीतर रस्त्यावरच्या भेळवाल्यालाही,
जिंकण्याचा अफाट विश्वास असतो.
मजा उलटली तुफानासारखी..
कि सजा होते मित्रा.
जीवन असेलही अवघड थोडं,
तरीही माणूस आहे भित्रा.

ओंजळीत माझ्या मी,
दुवे ठेवलेत जपून.
तेही माझ्याकडे परतलेत पुन्हा,
जे लावले तू हुलकावून.

Thursday, 6 January 2011

आवाज येतोय अजूनही,
त्या बोंबांचा.
वीट येतो तुझ्या त्या,
नकली सोंगांचा.
कश्यास हवा पाठपुरावा,
नकोश्या त्या ढोंगांचा?
 मावळतो तो चंद्र आणि..
माझा तुझ्यावरचा रागही.
पळून जातो अश्यावेळी,
माझ्यावरचा तुझा धाकही

इतकं वाईट खरं तर,
कधीच कुणी नसतं.
वेळ येतेच तशी म्हणून,
त्याचं वेगळं रूप दिसतं.
बंधन मला घातले मी,
तत्वे मला लादली मी.
तरीही माझ्यासाठी..
मुक्त दिशा शोधली मी.
.
डाग दिसतात नेहमी इथे..
चंद्राचे अन मनाचे.
दुर्लक्षित होतात ते ..
केवळ कोमल मनाचे.
रागाची आग लागली कि,
सगळं इथं नष्ट होतं.
नात्यांची पवित्रताही उरत नाही,
सगळं इथे भ्रष्ट होतं.

Tuesday, 4 January 2011

भास आणि श्वास यांचा मेळ कधी होत नाही,
रस्त्यावर चालता चालता खेळ कधी होत नाही,
रंगमंच लागतो रंग उधळायला नाटककाराला,
अन कवीला साधा कागद-पेन पुरतो झूलवायला .

सगळ्याच भावना कागदावर उतरवता येत नाही,
कित्येकदा खोल..मनातलं कुणालाही पाहता येत नाही.
कागद काय वरवरचा आधार...डोळ्यांसाठी असतो..
तरीही कित्येकदा मला तो सख्याच्या खांद्यासारखा भासतो.

Pages