माझ्या अंगणात स्वागत आहे तुमचं....माझ्याच शब्दांच्या फुलांनी..तुम्हाला ती आवडतील याची खात्री आहे..खूप लहानपणी मी हे रोपट लावलं..माझ्या वयानुसार तेही मोठं झालंय ...बहर अजूनही येतोय..सडा अजून पडतोय..तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत....नक्की द्या..आणि माझी शब्द फुलं अशीच वेचत राहा..
Tuesday, 11 January 2011
सिडनी
वातावरणातील उल्हास..मोहक,मादक असतो हे मला ह्या रम्य शहरात आल्यावर अधिकच जाणवू लागलं.जाता-येता ओपेराहाउसचं मोहक दृश्य,ब्रिज,पाणी,कधी ऊन,कधी पाऊस,सुंदर अगणित समुद्र,डोळ्याचं पारणं फेडणारं नैसर्गिक सौंदर्य..हिरवेगार बगीचे मनाला खूप तजेलदार करतात.इथल्या वातावरणात नेहमी एख्याद्या मोठ्या सणाचं स्वरूप असतं.नेहमी काहीतरी कार्यक्रम असतात.स्वतःला गुंतवून घेणं यांच्या रक्तातच आहे.आणि तेही मनोरंजन करत.मला हे जिवंत माणसाचं लक्षण वाटतं.अनोळखी व्यक्तीलाही आदरपूर्वक स्मितहास्य करून त्याची विचारपूस करण्याचं कौशल्य तर अचंबित करणारं आहे.माझे शब्दही कमी आहेत याचा सौन्दर्य व्यक्त करायला.ते फक्त डोळ्यांनी आस्वादण्याचं आणि त्यात साठवून ठेवण्याचं आहे....
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment