डोळ्याच्या किनारयातून तू कधी शिरलाही नाही.
अन मनाच्या रिक्त पोकळ्या कधी तू भरल्याही नाहीस.
नुसताच वाऱ्यासारखा जवळ आलास...अन
खोल अंतकरणात शिरून नशा बनुन उरलाहि नाहीस..
काल तुझ्यावतीने मी स्वतःच..केसात कुरवाळीले..
कालही मोगरयाला दुरूनच न्याहाळले..
शोधले तुला कुठे कुठे नाही..?
शांत पाण्यालाही मी चाळवले..
ये जरा बरसून ये...खूप सरी घेऊन ये..
सोडून ये पाश सारे..मुक्त जरा होऊन ये.
मला हवाहवासा तो नशा बन..आणि मोगरा होतात घेऊन ये..
आता येताना माझा फक्त माझ्यासाठीच होऊन ये.
आता येताना माझा फक्त माझ्यासाठीच होऊन ये.
ReplyDeleteHech tar sarvanch swapan asat.....
sundar..
chaan avadala!!!
ReplyDelete