Thursday, 26 May 2011

ब्लॉग लिहायला सुरवात केली तेव्हापासून डायरी लिहिणं बंद झालं.आता स्वतःचं काहीही वाचायच झालं तर..आधी ऑनलाईन यावं लागतं.आता कागदांवर लिहिणं सुटलय..अस्ताव्यस्त पडलेली कागद आता कधीच नसतात माझ्याकडे.कंटाळा आला म्ह्णून सुचलं तरी लिहायचं सोडलाय ...काहीश्या ओळी मात्र लिहून होतात..तसेच काही विचारहि....लिहिणं सुद्धा रटाळ वाटतं कित्येकदा.. भावना शब्दात मांडल्या कि..मनातले विचार...त्यात जाऊन बसतात...भावनांचे तात्पुरता स्थलांतर होते ते असे...

Wednesday, 25 May 2011

नेहमी असंच वाटलं..न बोलताच..
तू समजून घेशील सगळं.
आता पुन्हा..एकट बोलणं...
आभाळाशीच ...भांडण सगळं 

Sunday, 22 May 2011

देव..

तसा देव देऊळात आहे,
अन श्रद्धेने भक्ताच्या मनात आहे.
तरी तो जातोच भेटी राऊळाला,
अन श्रद्धेचे प्रतिक हारा-नैवेद्याला.

देतो काहीसे...चलाख आहे,
बदल्यात त्याच्या मनोकामनेचा बदलाच आहे.
थोडेसेच काहीसे हवे सदा त्याला,
अन मग नवसाचे वाचन पुन्हा देवतेला.

येतोच आहे पुढल्या भेटीला,
जरा बघवे..अन सावरावे या घडीला.
देवा असे उपेक्षु नको रे..
तुझ्यावीण कोण मला पामराला?

चाले न जेव्हा नवसाचेहि जेथे,
तेथे दोषाचे खापर नशिबाला.
कोसुन जेव्हा शिणतो बिचारा,
असे पाडसे पुन्हा शरण देवाला.

काय फरक पडतो जर तो पाषाणी आहे,
किंवा कोपऱ्यात मनातील गाढ श्रद्धेच्या?
झेलतोच तोही अगणित मागण्या...
पण जरासा विचारी आहे..बाबतीत कृपेच्या.

तसा देव देऊळात आहे,
अन श्रद्धेने भक्ताच्या मनात आहे.

Saturday, 21 May 2011

तू जवळ असतांना,
तुझ्यावर..रुसव्यांवर रुसवा.
अन तू दूर गेल्यावर,
तुझा भासांवर भास ...फसवा.

Tuesday, 17 May 2011

Praising Is Good!

Praising other's things...is very good.It boosts the person and give courage to him for doing his next best things...i don't understand why people don't give comments to the person's some particular good thing?You don't now how much it affects...but this small things..makes larger differences... don't leave this chance.You will feel satisfied for that too.Hope you get my point..:)
Good day friends!

Monday, 16 May 2011

नुसत्या तुझ्या विचारण्यानेच..
किती जीवात जीव येतो.
  नाहीतर त्या परक्यापणाने..
    अक्खा दिवस कासावीस होतो.

Monday, 9 May 2011

शिकणं...

पावसाकडून शिकावं कुणी..
गर्जून बरसून,रडून घेणं.
आणि अश्रूचा पूर वाह्तानाही..
अक्ख्या धरणी ला सुखावून देणं.

Friday, 6 May 2011

वाटा...


वाटांनाही हजार वाटा..
त्यांच्याच नकळत फुटलेल्या.
काही गोष्टी मनात अश्याच...
पण अगदी खोल रुतलेल्या.

Thursday, 5 May 2011

जाता येता वाटांनाही,
नजर लावण्यात मजा असते.
परतानारं  नसेल कुणी त्यावरून..
तर मात्र सजा ती असते.


Wednesday, 4 May 2011

हक्क...


कोण म्हणतो आपल्याला...आपली वाटणाऱ्या व्यक्तीवर..
आपला पूर्ण हक्क असतो?
तो तितका गाजवू द्यायचा कि नाही...
हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.



हाती म्हणे आयुष्याची,
रेषा असते आखलेली...अन...
थकताच लाख उपायाअंती,
नशिबावर ती लादलेली.

Pages