तसा देव देऊळात आहे,
अन श्रद्धेने भक्ताच्या मनात आहे.
अन श्रद्धेचे प्रतिक हारा-नैवेद्याला.
देतो काहीसे...चलाख आहे,
बदल्यात त्याच्या मनोकामनेचा बदलाच आहे.
थोडेसेच काहीसे हवे सदा त्याला,
अन मग नवसाचे वाचन पुन्हा देवतेला.
येतोच आहे पुढल्या भेटीला,
जरा बघवे..अन सावरावे या घडीला.
देवा असे उपेक्षु नको रे..
तुझ्यावीण कोण मला पामराला?
चाले न जेव्हा नवसाचेहि जेथे,
तेथे दोषाचे खापर नशिबाला.
कोसुन जेव्हा शिणतो बिचारा,
असे पाडसे पुन्हा शरण देवाला.
काय फरक पडतो जर तो पाषाणी आहे,
किंवा कोपऱ्यात मनातील गाढ श्रद्धेच्या?
झेलतोच तोही अगणित मागण्या...
पण जरासा विचारी आहे..बाबतीत कृपेच्या.
तसा देव देऊळात आहे,
अन श्रद्धेने भक्ताच्या मनात आहे.
No comments:
Post a Comment