Thursday, 29 September 2011

अश्या तडाखी उन्हात ..
माझी एकाकी हि वाट.
साथीला हा सूर्य तापलेला...
अन मला हवीशी...पहाट.

Thursday, 22 September 2011

मला वाटते सहज एकदा..
करार करावा माझ्या शरीराशी.
कापून सारे अंतर आणि..
विलीन व्हावे तुझ्या श्वासाशी.

Wednesday, 14 September 2011

सुर्यास्ताच्या वेळी मला 
दुविधेत पाडू नकोस.

माझ्या चंचल मनाला
निराशा दाखवू नकोस.

पहिले जे स्वप्न मी 
त्यात अडथळे  आणू नकोस.

वाटेवरच वाटसरूचा 
असा प्रवास थांबवू नकोस.

सुर्योदयाची स्वप्ने पाहते मी
मला सूर्यास्त दाखवू नकोस.

हे ईश्वरा तुझाच अंश मी 
छोट्याश्या आयुष्यात क्रियाहिनतेचा डाग लावू नकोस.

Sunday, 11 September 2011

आयुष्यचक्र...

कळी उमलते,
         फुल बनते.
सुगंध पसरवते,
        मनाला प्रफुल्लीत करते.
नंतर कोमजते.
           न सुगंध येतो.
न उरते ती प्रफुल्लता,
        मिटून जाते फुल मग..
आणि भासते असे...
         जसे मानवाचेही होते.
उमलून ,फुलून,
         सुगंध पसरवून
कोमजून, प्रफुल्लून,
         शेवटी मिसळते...
मग राखच..
           फक्त मातीत.
न उरते अस्तित्व,
          न उरतो  सहवास.
प्रत्येकाचं असंच....चालतं 
         ऋतुचक्र,आयुष्यचक्र.

Saturday, 10 September 2011

कश्यासाठी...


कश्यासाठी अपेक्षा करावी  कुणाकडून,
जर एकटाच येतो जन्माला,
अन जातोही एकटच आपण.

रडावसं वाटल्यावर,
खांदा द्यायला कुणीच नसतं.
आपली मतं जाणून घ्यायला,
कुणी इथे रिकामं नसतं.

मग कुणाची साथ कशाला हवी,
एकट वाटल्यावर.
एकटचं रडून घ्यावं आपण,
मन दाटल्यावर.

तुम्ही कुणासाठी धावून गेलात,
पण तुमच्यासाठी धावायला कुणीच नाही.
त्यांच्यासाठी ते काहीही असो,
पण आपलं ते कर्तव्यच असतं.

आपलं,आपले आपणच म्हणतो,
जो तो स्वार्थ बघतो.
फटका बसला,भ्रम गेला कि,
तेव्हा डोळा उघडा होतो.

मग खूप उशीर झालेला असतो तेव्हा,
बिघडलेलं सारं सावरण्यासाठी.
तेव्हा खरं सुरु होतं जीवन,
आपण स्वतःसाठी जपण्यासाठी. 

Pages