वेचलेले सगळेच,
पेरण्यासारखे नसते.
मुठीत आलेले सगळे,
झेलण्यासारखे नसते.
असे कितीसे व्यर्थ,
येउन मिळते आपल्याला.
अर्थ नसतात त्याला,
जाणीव असते आपल्याला.
म्हणून म्हणतात काहीकाही.
सोडून द्यायचे असते.
नाहीतर इवलेशे मनपिल्लू,
त्याला देखील फसते.
अस्मिता :)
chann aahe..
ReplyDeletenice 1...........manpillu :-p
ReplyDelete