कोरून कोरून लिहावेसे वाटते,
आभाळाच्या या निळसर पाटीवर.
तर कधी वाटते होऊन रिमझिम पाऊस,
बरसत राहावे सुगंधी मातीवर.
वाटे मजला कधी कधी तर,
झुळूक व्हावे वाऱ्याची.
आणि होऊनी मंद बासुरी,
गीत गावे पक्ष्यांच्या कानाशी.
कधी वाटे मजला,
एकरूप व्हावे हिरव्यागार वृक्षांशी.
आणि उरून राहावे उभारी बनून,
मानवाच्या भावूक नजरेशी.
रूप घ्यावे वेगवेगळे अन,
ज्यादूपरी खेळावे मनझोकयाशी.
मिळे एकदाच आयुष्य हे,
कवटाळावे त्यास हृदयाशी.
No comments:
Post a Comment