आजपण तिने कागद हाती घेतला
टेबलवरच्या पेनाकडे थंड नजर टाकली
विचारच्या तंद्रीत बडवून घेतले स्वत:ला
खुपसे मतले सुचले
खुपसे किस्से आठवले
खुपसे खर्डे झाले
- मनातच ...
मैफिलच जमली जणू
काहींनी डोळ्यात पाणी आले
काहींनी हसून गाल दुखले
काहींचे वाचन झाले
काहीना टाळ्या मिळाल्या
तिचं समाधान झालं
ती उठून जायला निघाली
पेन उचलला नाही
एकही अक्षर लिहिले नाही
कागद कोराच राहिला
टेबलवरचा कागद वाऱ्यासोबत कधी उडून गेला
तिला कळालेही नाही
मनाचा कागद मात्र खच्च भरलेला
आजच्या कवितेने
तिने आजही कविता लिहिली
स्वत:साठी
कुठलाही पुरावा मागे न ठेवता !!
chhan
ReplyDelete