Wednesday, 4 June 2014

बाहेती

इयत्ता १ली माझी विशेष लक्षात आहे. कारण माझी शाळा घरापासून चांगलीच दूर होती. चालून चालून चांगलीच दमायची. शाळा चांगली असली तरी त्यापर्यंत जाणारे रस्ते एकाहून एक रहस्यमय होते. दुर्दैवाने मला चालत सोबत कुणी नव्हतं आई-वडील शिक्षक त्यामुळे त्याच वेळेत त्यांचे शाळेचे येणे जाणे.माझ्या शाळेचे नाव 'भारत विद्यालय' होते . हिच्याकडे जाणारे फक्त दोन रस्ते होते. एक म्हणजे शेताचा आणि दुसरा म्हणजे बाहेरून डांबरी रस्ता त्यावर सतत वाहनांची वर्दळ असे.शेताच्या रस्त्यावर शेतकी शाळा लागे आणि नंतर भले मोठे शेत आणि मध्ये रस्ता या रस्त्यावर फारशी गर्दी नसे. आणि कधी उशीर झालाच तर जीव मुठीत घेऊन कसबसं शाळेवर पोहोचणं म्हणजे भयाण कसरत होई. कारणही तसेच होते म्हणजे या रस्त्यावर लहान मुलींना पळवून नेण्याचे अनेक पराक्रम झालेले होते. आणि भरीस भर म्हणून एका शेतकी शाळेच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. आणि शाळेत शेतात त्याचा आत्मा फिरतो. म्हणून आतल्या रस्त्याने पदभ्रमण करणाऱ्यांनी बाहेरच्या रस्त्यावरुन भ्रमणास सुरवात केली. आता इकडून जायला सुरवात केली तेव्हा वाटलं इथे काही भूत येणार नाही आणि कोणी उचलूनही नेणार नाही. आणि मागे पुढे कुणीतरी अनोळखीही का होईना सोबत असे. साधारण महिना २ म्हणीने झाले असावे तश्या अफवा सुटू लागल्या या रस्त्यावरून जातांना  'बाहेती ' नावाचा बंगला लागे . रग्गड श्रीमंत मारवाडी कुटुंब तिथे राहत होते. एक दिवशी म्हणजे भर दुपारी कुणीतरी तिकडच्या ४-५  जणांचा खुण केला आणि सगळ्यांना ओढून वैगरे आणून अंगणात आणून ठेवलेले. इतकेसे  आठवत नाही आता पण दरोदाच पडलेला होताऽक्ख ऎवज  दरोड्यांनी नेलेला होता. आणि तिथल्या बाईनी म्हणे जखमी अवस्थेत दरोड्यांना मारायचा प्रयत्न केलेला आणि आता सारखा तिचा ओरडण्याचा आवाज या घरातून येतो. आता मात्र चांगलीच उडाली होति. आणि ३-४ दिवस शाळेला दांड्या मारून झाल्या पण आईने समजावूनही हिम्मत होईना.तेव्हा गल्लीत खेळतांना एक मैत्रीण झाली तीही एकून टरकलेली  होती मग दोघी मिळून धाडसाने शाळेत जाण्याचा निर्णय घेतला. आणि बाहेती जवळून जातांना जरा लांबूनच जायचे ठरले. हळूहळू आमचा समज झाला ती बाई लहान मुलांना त्रास देत नाही. त्यानंतर सतत १० वर्ष मी याच रस्त्याने गेली कित्याके वर्ष ते घर धूळ खात पडलं होतं. आणि अचानक एक दिवस त्या घराला नवीन रंग दिलेला पाहिला काही दिवसात तिथे कुणीतरी राहायला आले पण बाहेती खुण प्रकरण इतके कोरलेले होते डोक्यात कि रंगरंगोटी आणि गर्दी दिसली तरी सायकल जर दूरच चालवायची बाहेती जवळून अगदी आठवणीने आणि जीव मुठीत धरूनच.. 

No comments:

Post a Comment

Pages