Friday, 9 January 2015

आशेचा किनारा कधी संपतो का रे?
कधीच नाही ना..
एक आशा येते..तुझी..
मग येते सोबतीची,
मग येते स्वप्नांची,
अलवार कवटाळतो ना आपणही..
नाहीतर कसली धांदल होते इवल्याश्या मनाची.
आता यासोबत
आपल्याला कुणी साथ दिली तर..
दिल को सुकून....
नाहीतर फरफट नुसती..एकट्याची..
कश्यासाठी हि जन्म घेते पण आशा?
खरंतर आशे शिवाय मिळालेलं
प्रत्येक सुख वाऱ्यासारखा असतं मुक्त..
पण हि मनशृंखला...
आशेवरच विणते स्वप्नाचा झरा..
आणि नवीन,तरल पालवी फुटते तिला..
कोरी आशा..धडका तर बसतात पण..
हृदयाला फेटाळून लावणारी 'मतवाली आशा'.


No comments:

Post a Comment

Pages