माझ्या अंगणात स्वागत आहे तुमचं....माझ्याच शब्दांच्या फुलांनी..तुम्हाला ती आवडतील याची खात्री आहे..खूप लहानपणी मी हे रोपट लावलं..माझ्या वयानुसार तेही मोठं झालंय ...बहर अजूनही येतोय..सडा अजून पडतोय..तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत....नक्की द्या..आणि माझी शब्द फुलं अशीच वेचत राहा..
Friday, 7 January 2011
Thursday, 6 January 2011
Tuesday, 4 January 2011
Tuesday, 28 December 2010
आजकाल काही लिहावेसे वाटत नाही...कंटाळवाणे वाटते सगळे...इथले वातावरण कधी चांगले असते तर कधी नुसताच पाऊस..पण निळेशार आकाश बघायला खूप आवडते.आणि घराजवळच्या हिरव्यागार गवतावर तासंतास बसून रहावेसे वाटते...जमत नाही जायला ते वेगळेच...पण खरच तिथले वातावरण फार आल्हाददायक आहे..भारावून जावे कुठल्या पुस्तकाने असे इथे मला मिळत नाहीये...किवा नुसतच चालत राहावं सकाळच्या गार वाऱ्यात....तेही जमेना.असा काहीही न करण्याचा माझा बाणा नव्हता खरं तर...पण माहित नाही का काहीही जमत नाहीये...नाहीतर आयुष्यावर भरभरून प्रेम करणारी मी सतत काहीतरी असा वेगळं करत होते आधी...कुणीतरी म्हट्लये...आयुष्यात असा बऱ्याचदा होतं...काहीही उमगत नाही..थोडा काळ...धुकं असतं, थोडा काळ स्वच्छ आभाळ....मना मध्ये माझ्या मात्र स्वच्छ सकाळ...
Subscribe to:
Posts (Atom)
